शिक्षण विभागात नोकरी लावण्याची आमिषाने पैसे घेऊन नोकरीने लावता उमेदवारांची फसवणूक केल्याप्रमाणे गुन्हा दाखल होता या प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपयुक्त तथा प्रभारी आयुक्त शैलजा दराडे यांना निलंबित करण्यात आले आहे तब्बल पाच महिन्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे
प्रत्येकी 12 ते 15 लाख रुपये घेऊन तब्बल 44 उमेदवारांचे फसवणूक केल्याप्रकरणी पोपट सुखदेव सूर्यवंशी (रा. खानजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
शैलजा दराडे (रा. पाषाण) व त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा.इंदापूर) यांच्याविरुद्ध 22 फेब्रुवारी 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान दराडे यांनी पुण्यातील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता मात्र न्यायालयाने 29 एप्रिल 2023 रोजी हा अर्ज फेटाळला होता दरम्यान शिक्षण आयुक्तालयाने दराडे यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासाही मागवला होता त्यावर त्यांनी म्हणणे सादर केले होते त्यानंतर शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी संबंधित प्रकरणी चार जुलै 2023 रोजी राज्य शासनाला सविस्तर अहवाल सादर केला होता यानुसार दराडे यांनी केलेली कृती ही त्यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारे असल्याचे नमूद झाले त्याचे दखल घेऊन दराडे यांना शासन सेवेतून निलंबित करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव टी. वा. करपते यांनी नुकतेच जारी केले आहेत.
निलंबित असताना दराडे यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, त्यांना खाजगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय ठरणार नाही तसेच केल्यास त्या गैरवर्तुणुकीबाबत दोषी ठरणार आहेत असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान दराडे यांनी हे आदेश यांनी आधीच मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे त्यावर सोन्याची प्रक्रिया सुरू आहे त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.