पुणे

Big Breking news : तरुणांची माथी भडकवणारा इसिस संबंधित डॉक्टरला पुण्यातून अटक, NIA ची पुण्यात मोठी कारवाई…!

पुणे : प्रतिनिधी 

पुणे : डॉ. अदनानली सरकार याच्या कोंढव्यातील घरातून इसीसशी संबंधित अनेक दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.इसिस महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या एका डॉक्टरला कोंढव्यातून अटक केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

इसिस महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या एका डॉक्टरला कोंढव्यातून अटक केली. या प्रकरणातील ही पाचवी कारवाई आहे. डॉ. अदनानली सरकार वय वर्ष ( 43 ) असे त्याचे नाव आहे. त्याच्या कोंढव्यातील घरात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि ‘इसिस’शी संबंधित अनेक दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. त्याद्वारे डॉ. सरकार हा तरुणांना प्रेरित करून संघटनेत भरती करीत होता असे समजते. असे कृत्य करून तो समाजात अशांतता पसरवत असल्याचे उघड झाले.

 

“एनआयए’च्या तपासानुसार, डॉ. सरकार हा देशाची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत होता. पुण्यात काही दिवसांपूर्वी इसीस शी संबंधित एका इंजिनीअरला अटक केल्यानंतर एनआयएने मुंबई, ठाणे आणि पुणे येथे कडक शोधमोहीम राबवली आहे.
त्यानुसार ३ जुलै रोजी एनआयएने इतर चार जणांना मुंबईत अटक केली होती. मुंबईतील तबिश नासेर सिद्दिकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख, अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला अशी त्यांची नावे आहेत.

 

डॉ. अदनानली सरकार याने बी. जे. मेडिकलमधून 2001 मध्ये एमबीबीएस केले. त्यानंतर 2006 मध्ये भूलतज्ज्ञ म्हणून एम.डी. पदवी मिळवली. अनेस्थेशिया या विषयावर अन्य सहकाऱ्यांसमवेत सरकार याने अनेक शोधनिबंध लिहिले आहेत. गेली 16 वर्षांपासून भूलतज्ज्ञ म्हणून तो विविध हॉस्पिटलशी संलग्न आहे.