पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
मांजरी रेल्वे ओव्हरब्रिजच्या बांधकामामुळे रेल्वे क्रॉसिंग बंद झाल्याने मांजरी बुद्रुक, मांजरी खुर्द आव्हाळवाडी, वाघोली, अशा अनेक गावांचा संपर्क तुटला असल्याची तक्रार अनेकवेळा स्थानिक नागरिकांनी केली आहे.
वाहनांना रेल्वे क्रॉसिंग करता येत नाही. त्यामुळे मांजरीला जायचे झाल्यास केशव नगर, मगरपट्टा आणि मुंढवा येथून पर्यायी मार्गाने जावे लागते, त्यामुळे हडपसर, मगरपट्टा रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या असतात त्या परिसरातून प्रवास करणाऱ्या शेकडो लोकांसोबत स्थानिक लोकांनाही फार त्रास सहन करावा लागतो.ओव्हरब्रिज च्या रखडलेल्या कामाच्या संदर्भात कंत्राटदारकडे चौकशी केली असता हडपसर च्या बाजूने प्रवेश करणारी रॅम्प पूर्ण झाली असली तरी ते मांजरी गावाजवळ काही ठिकाणी त्यांना भूसंपादनाच्या समस्या भेडसावत आहेत. त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा निघाला की लगेंच काम सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.
परंतु हा पूल सध्या चालू करण्यात आला आहे. कोणाच्या सांगण्यावरून तो चालू केला आहे याची माहिती कोणालाच नाही. त्याचे संरक्षक कठडे ही अजून पूर्ण झालेले नाहीत उद्या जर काही अपघातात होऊन जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.