पुणे : मागील दोन तीन महिन्यात राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले. एक वर्षांपूर्वी शिवसेनेत मोठे बंड होऊन फूट पडली होती तशीच फूट राष्ट्रवादीतही पडली.आणि अजित पवार यांच्या गटाने भाजपसोबत जाऊन सत्तेत बसणे पसंद केले. त्यानंतर आज अजित पवार पहिल्यांदाच मीडियाला सामोरे गेले.आणि बंडानंतर प्रथमच त्यांनी आपली भूमिका मांडल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी अजित पवार माध्यमांसमोर बोलताना विस्तृत चर्चा करीत विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले. त्याच वेळी बोलताना मी खास महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपसोबत गेलो आहे असे अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. मला विकास पाहिजे, आणि मी विकासच करणार आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक प्रश्न रखडलेले आहेत , त्याकरिता केंद्राची मदत आवश्यक असते, अशा वेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकजुटीने मिळून काम करत असते. त्यावेळी राज्याचा निश्चितच विकास होत असतो.
भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधाणामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का? भिडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून माध्यमांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. भिडे महापुरुषांचा अपमान करीत असतात. यावर आमच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्टपणे भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आमचीदेखील भूमिका तशीच राहणार आहे. कोणतेही सरकार अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य खपवून घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भिडे वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी आता चौकशी सुरू असल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले.
शरद पवार साहेबांचा मी फार रिसपेक्ट करतो असेही सांगितले.उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार एका मंचावर पाहायला मिळाले. शपथविधी झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार हे शरद पवारांसमोर आले होते. एकाच मंचावर सर्व वरिष्ठ नेते आज उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर हे दोन नेते एकत्र पाहायला मिळाले. यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार शरद पवारांच्या मागून गेल्याने उपस्थितांमध्ये वेगळीच चर्चा सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.