पुणे

“नोकरीच्या अमिषाने 44 जणांची फसवणूक प्रकरणी शैलजा दराडे यांना अटक, 12 ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी, फेब्रुवारी मध्ये दाखल होता दाखल”

शिक्षण विभागात नोकरी लावण्याचा आमिषाने 44 जणांची पाच ते सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे  (वय 52 रा. पाषाण पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

 याप्रकरणी दराडे व त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे (रा. इंदापूर ) यांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात पोपट सूर्यवंशी रा. खाणजोनवाडी, आटपाडी, सांगली यांनी फिर्याद दिली आहे. सूर्यवंशी शिक्षक असून त्यांच्या नात्यातील महिलेला शिक्षक पदावर नोकरी हवी होती, त्यांची जून 2019 मध्ये आरोपी दादासाहेब दराडे यांची भेट झाली. मी तुमच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरीला लावतो असे सांगून हडपसर मध्ये 27 लाख रुपये घेतले, नोकरी न लावल्याने सूर्यवंशी यांनी 27 लाख रुपये परत मागितले परंतु पैसे परत नाही मिळाल्याने फसवणूक झाल्याची लक्षात येतात सूर्यवंशी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

 शिक्षण विभागात नोकरी लावण्याचा aamish दाखवून बारा ते पंधरा लाख रुपये घेऊन 44 उमेदवारांची फसवणूक  केल्याप्रकरणी दराडे बहीण भावांवर 22 फेब्रुवारी 2023 रोजी गुन्हा दाखल झाला होता.

 

“नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलाच्या दराडे व दादासाहेब दराडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. यामध्ये त्यांना न्यायालयात हजर केले असता 12 ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.”

रविंद्र शेळके

वरिष्ठ पोलीस निरीक्षक – हडपसर