चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आज 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. या मोहिमेकडे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. चांद्रयान 3 यशस्वीरीत्या चंद्रावर उतरावे यासाठी देशातील अनेक भागात होमहवन,नमाज पठण केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सारसबागेतील श्री सिद्धिविनायक मंदिरात शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाआरती आणि होमहवन करून गणरायाकडे चांद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी शहरप्रमुख नाना भानगिरे म्हणाले की, चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. त्यामुळे ही मोहीम यशस्वीपणे पार पडावी याकरिता आम्ही सर्व शिवसैनिकांनी गणराया चरणी प्रार्थना केली आहे. तसेच आगामी काळात या मोहिमेमुळे अनेक तरुण शास्त्रज्ञ घडो, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सहसंपर्कप्रमुखअजय (बाप्पू) भोसले, शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, जिल्हा प्रमुख रमेश बाप्पू कोंडे,उल्हास भाऊ तुपे,युवासेना सहसंपर्कप्रमुख अविनाश खेडेकर, शहर संघटक श्रीकांत पुजारी,प्रमोद प्रभुणे, उपशहर प्रमुख सुनिल जाधव, सुधीर कुरूमकर,संजय डोंगरे,संतोष लांडगे महिला उपशहरप्रमुख श्रुती नाझिरकर, अयोध्या आंधळे, सारिका पवार, नितीन लगस, अक्षय तारू, दीपक कुलाल, नवनाथ निवंगुणे, राजू ढेबे, शहर प्रवक्ते अभिजीत बोराटे व असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.