पुणेमहाराष्ट्र

Crime news दुचाकी चोरास भारती विद्यापीठ पोलिसांनी ठोकल्या बेडया…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुणे शहरातील आणि शहराच्या बाहेरील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून ३ लाखांच्या ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, तीन गुन्ह्यांची उकल केली आहे. शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या एका चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून ३ लाखांच्या ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, तीन गुन्ह्यांची उकल केली आहे.

 

कुणाल सुरेश बधे (वय 28, रा. रांजणे, ता. वेल्हा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याने कोंढवा पोलीस स्टेशन व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन गाड्या चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहेत.

ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता व पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, हर्षल शिंदे, सचिन गाडे, सचिन सरपाले, राहुल तांबे, विक्रम सावंत व त्यांच्या पथकाने केली आहे.मागील काही दिवसांपासून पुणे शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दहा दिवसात ४३ वाहने चोरीला गेल्याचे समोर आले आहे त्यामुळे स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेला याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून भारती विद्यापीठ पोलीस हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, हर्षल शिंदे, सचिन गाडे यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील वाहन चोर कुणाल बधे हा लिपाणे वस्ती येथे चोरीची एक दुचाकी घेऊन थांबला आहे. त्यानूसार, पथकाने त्याला सापळा रचून पकडले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर त्याने दुचाकी चोरीची असल्याची कबूली दिली.

आणखी चौकशी केल्यानंतर कोंढवा येथून दोन आणि भारती विद्यापीठ येथून एक अशा तीन दुचाकीचे चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तर, 3 लाख रुपये किमतीच्या 5 दुचाकी गाड्या त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. आणखी दोन दुचाकींबाबत त्याच्याकडून अधिक तपास करण्यात येत आहे.या कामगिरी चे वरिष्ठाँकडून पोलिसांचे कौतुक करण्यात आले आहे.