हडपसर मधील अमरधाम स्मशानभूमी मध्ये जर एखादी व्यक्ती मृत्यू झाली आणि जर तिला दफन करायचं असेल म्हणजे तिला मातीमध्ये दफन करायचे असेल तर मात्र खड्डा घेणे आणि माती भरून देणार या कामासाठी पुणे महानगरपालिकेचे तेथील कर्मचारी मृत व्यक्तीच्या नातेवाईकाकडून अडवूनक करून सुमारे 3000 रुपये घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे, महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी भीक मांगो आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी दिला आहे.
गेल्या आठवड्यामध्ये ससाणे नगर मधील एक मयत झाली असता नगरसेवक योगेश ससाणे यांनी महानगरपालिकेचा जेसीबी रात्री नऊ वाजता स्मशानभूमी मध्ये खड्डा घेण्यास घेण्यासाठी पाठवला होता सदरची मयतविधी रात्री दोन वाजता झाला होता. दोन दिवसांनी नातेवाईकांशी ससाणे बोलले असता त्यांना नातेवाईकांकडून रात्री 3000 रुपये घेतल्याची तक्रार करण्यात आली. नगरसेवकांनी स्मशानभूमीत जाऊन चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तर देण्यात आली त्यानंतर त्या ठिकाणचा ठेकेदार श्री.पोटे यांच्याशी बोलले त्यालाही गोष्ट कानावर घातली परंतु त्याच्याकडुन कोणत्याही प्रकारची कार्यवाही किंवा कारवाई केली गेली नाही. योगेश ससाणे यांनी आज सदर बाब महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली आहे व लेखी पत्र ही देणार आहे परंतु मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याची ही जी सवय महानगरपालिकेचे यंत्रणेला लागलेली आहे ती संपणार कधी ? थांबणार कधी ? हाच मोठा प्रश्न आहे .
एकंदरच पुण्यासारख्या शहरांमध्ये मृत्यू पण फुकट नाही लाकूड फाटा जाळण्यासाठी चे मटेरियल विकत घेणे हे क्रमप्राप्त आहे परंतु महापालिकेच्या जेसीबीने घेतलेला खड्डा एक तर नातेवाईक बुजवत असतात परंतु चार दोन फावडी मारल्यानंतर सुद्धा जर तिथला कर्मचारी 3000 रुपये उकळत असेल तर मात्र ही बाब शरमेची आहे .म्हणून वाटतं की या ठिकाणी मृत्यू सुद्धा ओशाळलाय…..
भीक मांगो आंदोलन करून कर्मचारी अधिकाऱ्यांना देणार पैसे…
हडपसर स्मशान भूमी तील मनपा कर्मचाऱ्यांना मेलेल्या माणसांच्या टाळु वरील लोणी खाण्याची सवय लागली आहे व त्यांना पाठीशी घालणा-या मनपा अधिकारी व ठेकेदार व काही लाचखोर लोकप्रतिनिधी च्या वैयक्तिक खर्चा साठी भिक मांगोआंदोलन सोमवार दि १८ सप्टेबर रोजी अमरधाम स्मशान भूमी माळवाडी येथे सकाळी ९ वाजता आयोजित केले आहे, तरी सर्व नागरिकांनी रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये भीक म्हनुन द्यावी.
योगेश दत्तात्रय ससाणे
मा.नगरसेवक पुणे मनपा