पुणे ः
हडपसर परिसरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील मोबाईल चोरणाऱ्यांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कौशल मुन्ना रावत (वय 21, रा. बंगला बाजार, चारबाग रेल्वे स्टेसन, लखनौ, उत्तर प्रदेश) मंतोषसिंग श्रवण सिंह (वय 22), जोगेस्वर कुमार रतन महातो ऊर्फ नोनीया (वय 30), सूरज रामलाल महातो (वय 30, सर्व रा. बाबुपूर, तिनपहार रेल्वे स्टेशनजवळ, जि. सायरगंज, झारखंड) अशी अटक केलेल्यांची नावे असून, एका विधिसंघर्षिताला ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून तीन लाख 80 हजार रुपये किमतीचे 20 मोबाईल संच जप्त करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, गणेशोत्सवादरम्यानच्या गर्दीत मोबाईल चोरी करण्यासाठी 15 सप्टेंबर रोजी चोरटे लखनौ रेल्वे स्टेशनवर चोरटे एकत्र भेटले. त्यानंतर 20 सप्टेंबर रोजी पुणे रेल्वे स्टेशनवर येऊन हडपसर, बंडगार्डन, स्वारगेट, फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत गर्दीमध्ये मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून चार गुन्हे उघडकीस आले असुन, पुढील तपास पोलीस नाईक अंकुश बनसुडे करीत आहेत. सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप नवले यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, अविनाश शिंदे, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, मनोज सुरवसे, अमोल दणके, कुंडलिक केसकर, रशीद शेख, पोलीस मित्र अविनाश ढगे, शुभम खाडे, कावेरी फाळके, पूनम काळे, प्रतिक माने यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.