पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजेपुणे : दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -२ , कडील अधिकारी व कर्मचारी हे हडपसर आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार शिवाजी जाधव आणि उदय काळभोर यांना मिळालेल्या माहिती नुसार अल्फा पेट्रोल पंप नायगाव फाटा पुणे येथे दोन इसम वाहनचोरीतील २ दुचाकी वाहने विक्री करणार आहेत अशी बातमी मिळाली त्यानुसार पथकाकडील अधिकारी व अंमलदार असे सदर ठिकाणी जावून खात्री करून इसम नामे १)नाना उर्फ मल्हारी बाबुराव पोळे वय २७ रा.आष्टा ता.लोहारा जि.धाराशिव २) कार्तिक प्रकाश भुजबळ वय २६ रा. लोणी काळभोर पुणे या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांना सदर वाहनांबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर दुचाक्या या लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरल्याचे सांगितले.
त्यांचेकडून खालील प्रमाणे दोन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत
१)लोणी काळभोर पो स्टे गु र न ५९६/२०२३ भा द वी कलम ३७९
२) लोणी काळभोर पो.स्टे.गु.र.नं.५९८/२०२३ भा.दं.वि.कलम ३७९
प्रमाणे एकूण ७०,००० -/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री.रामनाथ पोकळे अपर पोलिस आयुक्त गुन्हे,श्री. अमोल झेंडे सो पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्री. सतिश गोवेकर सो सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ यांच्या मार्गदर्शन खाली वपोनि नंदकुमार गायकवाड पोलीस अंमलदार उदय काळभोर,राजेश अभंगे, सुदेश सपकाळ,शिवाजी जाधव, अमोल सरतापे यांनी केली आहे.