पुणे

“विविध उपक्रमांनी जयहिंद मित्र मंडळाचा सुवर्ण महोत्सव साजरा… “कार्यक्रमांचे आयोजन भव्यदिव्य विसर्जन मिरवणूक…

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज )
महादेव नगर येथील जय हिंद मित्रमंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने मंडळांनी तिरुपती बालाजीचा देखावा साकारला तसेच दहा दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले. महादेव नगर परिसरात भव्य विसर्जन मिरवणूक काढून लाडक्या गणरायाला निरोप दिला.
महादेव नगर येथील जय हिंद मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दहा दिवस नागरिकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये आळंदी येथील ह.भ.प पाटील महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले तसेच भव्य लिजेण्ड रॉक स्टार आर्केस्ट्रा व अभिनेते किरण पाटील प्रस्तुत होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन झाले या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पैठणी व विविध बक्षीसांची लयलूट या कार्यक्रमात मंडळाच्या वतीने करण्यात आली. बालगोपाळांसाठी बाल मेळावा आयोजित केला होता मोठ्या प्रमाणात बाल गोपाळांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. कलाकारांसाठी नृत्य स्पर्धा आयोजित केली होती विजेत्यांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिके देण्यात आली.

दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवामध्ये माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, सोनल चेतन तुपे, इशान चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे कार्याध्यक्ष अमर तुपे, महिला कार्याध्यक्षा सविता अनिल मोरे, उपाध्यक्ष प्रशांत घुले, समीर तुपे, रोहित मोरे, जयश्री आदमाने, माजी सरपंच पुरुषोत्तम धारवडकर, माजी उपसरपंच अमित घुले, विजया शेळके, महाजनहित प्रतिष्टानचे महासचिव हेमंत ढमढेरे, हडपसर पोलीस स्टेशनचे गुन्हेचे पोलीस निरीक्षक डगळे, उमेश शेलार, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, हरिभाऊ काळे, ह्यूमन राईट्स पुणे प्री्सीडेन्ट के. टी.आरु, श्रीदेवी गांधी, अंजुला जैस्वाल, मनीषा शेवाळे, मनीषा राऊत, शलाका पाटील, प्रा. संध्यारानी गावडे, रागिणी सोनवणे,  निशा समेल, किरण वाळके, आरती वाळके, डॉ. विशाल वाळके यांनी भेट दिली.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक राकेश तुपे, मार्गदर्शक भारती रमेश तुपे, अध्यक्ष विश्वजित तुपे, सुयश पाटील, सिद्धार्थ मोरे, प्रतीक टकले, दिनेश जवळकर यांनी केले.

सुवर्ण महोत्सवी वर्षात विविध उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा….
महादेवनगर येथील जय हिंद मित्र मंडळाच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने महिला, लहान मुले व जेष्ठ नागरिक यांना डोळ्यासमोर ठेवून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले, या उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला, हजारो नागरिकांनी उत्सवात सहभाग घेतला, सर्व नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा केला.
सौ.भारती रमेश तुपे
आधारस्तंभ – जय हिंद मित्र मंडळ – महादेवनगर