पुणे (प्रतिनिधी )
आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने आज ईद-ए-मिलाद च्या निमित्ताने सय्यद नगर परिसरातील रहमानी मदरसा या मुलींच्या अनाथालयात आज हायजिन किट व मेडिकल किटचे वाटप करण्यात आले.
आर्थिक परिस्थितीमुळे अनाथालय व मदरसा येथील मुलांकडे दैनंदिन वापरातील गरजेच्या वस्तू उपलब्ध होत नाहीत त्यामुळे मुले इतरांच्या वस्तू वापरून त्यांच्यामध्ये सर्दी, खोकला, त्वचा, केस यांचे संसर्गजन्य विकार विकार होण्याचे प्रमाण जास्त आहे, हे टाळण्यासाठी त्यांना संस्थेच्या वतीने ईद-ए-मिलाद च्या निमित्ताने हायजिन किट चे वाटप करण्यात आले. अशी माहिती प्रा शोएब इनामदार यांनी दिली.
तसेच या सर्व मुला मुलींची आरोग्य तपासणी प्रामुख्याने दात डोळे कान नाक घसा या सर्व बाबींची तपासणी संस्थेच्या वतीने मोफत करण्यात येत आहे असे संस्थापक अध्यक्ष प्रा शफी इनामदार यांनी नमूद केले.
इनामदार एनव्हिजन डोळ्यांचा दवाखान्याच्या वतीने डॉ अबोली इनामदार यांनी स्वच्छतेचे महत्त्व यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा शफी इमानदार, प्रा शोएब इमानदार, शकीला इनामदार, डॉ अबोली इनामदार, मुख्याध्यापिका शाहीन मुजावर, कौसर इनामदार, रमिजा तांबोळी, महेजबिन शेख, नेहा पठाण, रहमानी मुलींचे अनाथालय व मदरसाच्या रिजवाना खान उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन कार्याध्यक्ष फहिम इनामदार यांनी केले.