पुणे / हडपसर (स्वप्निल कदम)
नवरात्र महोत्सव साजरा करताना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घेण्याबरोबरच पुण्यात अतिरेकी झालेली कारवाई लक्षात घेता नागरिकांनी सतर्क रहावे व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी केले.
हडपसर परिसरात होणाऱ्या नवरात्र महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये नवरात्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
हडपसर चे वात्स पोलीस निरीक्षक उल्हास कदम, गुन्हेचे पोलीस निरीक्षक विश्वास डगळे, पीएसआय दिनेश शिंदे, unमाजी नगरसेवक योगेश ससाणे, पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना पुरस्कृत नवरात्र महोत्सवचे अध्यक्ष बाळासाहेब भिसे, कार्याध्यक्ष अनिल मोरे, पत्रकार दिपक वाघमारे, उत्तम कामठे, महिला दक्षता समिती सदस्या रोहिणी भोसले, सविता मोरे, भारती तुपे, मनीषा राऊत, विजया शेळके, मनीषा ढवळे, ऍड. अनिता पोतदार, अमृता खेडेकर, आदी उपस्थित होते.
हडपसर मधील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटील बनत चालली आहे, गणेशोत्सव, नवरात्र काळात वाहतूककोंडी खूप होते, हडपसर मधील सर्व प्रमुख चौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी व वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी यावेळी अनिल मोरे यांनी केली.
हडपसर मधील नागरिक शिस्त पाळत नसल्याने वाहतूककोंडी होते, अनेक उपाययोजना केल्या जात आहेत नवरात्र मध्ये मंडळानी सहकार्य करावे जेणेकरून वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मदत होईल असे मत वाहतूक पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी व्यक्त केले.
हडपसर मध्ये गणेशोत्सव काळात परिस्थिती उत्तम हाताळल्याने हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांचा सत्कार महिला दक्षता समितीच्या वतीने करण्यात आला.
नवरात्र मंडळाच्या परवान्याबाबत एलआयबी प्रमुख दिनेश शिंदे यांनी माहिती देऊन उपस्थितांचे आभार मानले.