पुणेहडपसर

“हडपसर नवरात्र महोत्सव मध्ये महिलांसाठी साडेतीन शक्तीपीठ दर्शन पर्वणी प्रसिद्ध सेने कलादिग्दर्शक संदीप इनामके साकारणार देखावा

हडपसर / पुणे (प्रतिनिधी )

तुंबाड, ख्वाडा, या चित्रपटाचे कला दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक संदीप इनामके यांच्या संकल्पनेतून हडपसर मध्ये साडेतीन शक्तीपीठ देवी देखावा साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना पुरस्कृत नवरात्र महोत्सवातून खास महिलांसाठी दर्शनाची पर्वणी असणार आहे.

 

हडपसर मधील प्रसिद्ध पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना पुरस्कृत नवरात्र महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी हाच महिलांसाठी साडेतीन शक्तीपीठ देवीचे दर्शन होण्याच्या दृष्टीने साकारण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडची रेणुका देवी, तुळजापूरची तुळजाभवानी, वणीची सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तीपीठाबरोबरच काळुबाईची मांढरदेवी व पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटनेची देवी अशा सहा देवीचे दर्शन एकाच छताखाली होणार आहे.
अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब भिसे, अध्यक्ष हेमंत ढमढेरे कार्याध्यक्ष अनिल मोरे यांनी दिली. यावेळी कार्याध्यक्ष शैलेश नवले, उपाध्यक्ष प्रीतम बडदे, राजेंद्र गायकवाड उपस्थित होते.

 

यासाठी 16 बाय 50 फुटाचा भव्य मंडप उभारण्यात आला असून मंडपासमोर सिंह मंडप, मंडपा बाहेर दोन दीपमाळा, मंडपात प्रवेश केल्यावर दोन नगारे, त्यानंतर डाव्या व उजव्या बाजूला पाच देवी व समोर मुख्य चौथर्‍यावर मंडळाच्या देवीची स्थापना होणार आहे, चौथर्‍याच्या शेजारी घटस्थापना व चौथऱ्याच्या बाहेर परत दोन नगारे लावण्यात येणार आहेत, छतावर नागाची भव्य प्रतिमा व जागरण गोंधळ प्रतिक लावली जाणार आहेत, छताला भव्य दोन घंटा बसविण्यात येणार आहेत, भिंतीवर वडाच्या पारंब्या सोडण्यात येणार आहे, पूर्णपणे धार्मिक मंदिराप्रमाणे धार्मिक वातावरण या ठिकाणी निर्माण केले जाणार असल्याची माहिती सिने कला दिग्दर्शक संदीप इनामके यांनी बोलताना दिली.

 

पंधरा तारखेला भव्य मिरवणूक हडपसर परिसरात पारंपारिक पद्धतीने काढून मुख्य देवीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे,
दहा दिवस महिलांसाठी या ठिकाणी रांगेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून पूर्ण पवित्र मंदिराचे वातावरण महिलांसाठी खास पर्वणी असणार आहे.
नवरात्र महोत्सवामध्ये नऊ महिलांना शक्तीपीठ जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच आंतरराष्ट्रीय कारपटू निकिता खडसरे टकलेचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
वाहतूककोंडी होऊ नये म्हणून सुरक्षारक्षक, व महिलांच्या सुरक्षेसाठी सिसिटीव्ही कॅमेरे बसविणार असल्याचे अध्यक्ष हेमंत ढमढेरे यांनी सांगितले.