पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
पुणे : लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रोखठोक महाराष्ट्र चे प्रतिनिधी स्वप्नील सुभाष कदम व त्यांचा १७ वर्षीय मुलगा सिद्धराज स्वप्निल कदम या दोघांना गाडी काढण्याच्या किरकोळ कारणावरून स्थानिक गावगुंडाकडून जबर मारहाण झाली होती. मारहाणीत कदम यांच्या मुलाच्या डोळ्याला व नाकाला गंभीर इजा झाली होती तसेच स्वप्नील कदम यांना किरकोळ दुखापत झाली होती. त्या मारहाणीत गाव गुंडानी स्वप्नील कदम यांच्या गळ्यातील दिड तोळ्याची चैन हिसकावून पळून गेले होते.
वास्तविक पाहता पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. सदरील घटना घडल्याबरोबर कदम यांनी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन लेखी स्वरूपात तक्रारी अर्ज देऊन १५ दिवस झाले तरी त्या गाव गुंडावर स्थानिक नेतेमंडळींच्या दबावाला बळी पडल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कसलीही कारवाई केली नाही. वास्तविक पाहता पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे पत्रकारांवर हल्ला होणे ही अतिशय निंदनीय बाब आहे. आणि त्याहीपेक्षा पोलिसांकडून यासंदर्भात कसलीच कारवाई न करणे ही त्याहीपेक्षा निंदनीय बाब आहे.
त्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता कुणाकडूनही ठोस असे उत्तर मिळत नाही. त्यामुळे रोखठोक महाराष्ट्र चे संपादक अनिल मोरे तसेच मराठी पत्रकार परिषद चे पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना फोनवरून प्रतिनिधीला झालेल्या मारहाण प्रकरणी चौकशी करून संबंधित गावगुंडावर कुठल्याही दबावाला बळी न पडता योग्य ती कडक कारवाई करावी असे सांगितले होते. परंतु १५ दिवस होऊन ही त्याच्यावर कसलीही कारवाई संबंधित अधिकाऱ्यांकडून झाली नाही त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कामत कसूर व दप्तर दिरंगाई कायद्यांतर्गत त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
यासाठी मराठी पत्रकार परिषद, मुंबई, पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न हवेली तालुका संघ यांच्या वतीने मुख्य विस्वस्त एस एम देशमुख सर , यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शरद पाबळे सर व पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच हवेली तालुका अध्यक्ष रमेश निकाळजे यांच्या नेतृवाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे गुरुवार दिनांक १९/१०/२०२३ रोजी एकदिवशीय तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे.