पुणेमहाराष्ट्र

ओम एज्युकेशन सोसायटी “एंजल हायस्कुलचे” बेकायदेशीर नियम बाह्य बांधकाम पाडून एंजल हायस्कुल मधील आर्थिक गैर व्यवहारा बाबत चौकशी करुन कारवाई करणे बाबत…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : आज दिनांक २३/१०/२०२३ रोजी लोणीकाळभोर येथील लोणीस्टेशनच्या चौकात “ऑल इंडिया संपादक संघ” यांचे मार्फत एंजल स्कुल बाबत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. ग्रामपंचायत कदमवाकवस्ती हद्दितील एंजल इंगलिश मिडीयम स्कुल बाबत परिसरातील अनेक पालकांच्या तक्रारी आल्यामुळे तसेच एंजल स्कूल ने एका जागेवर अवैध्यरित्या चालू केलेल्या बांधकामास त्वरित स्थगिती मिळण्यासाठी आंदोलन करण्यात आले. तपशिल खालील प्रमाणे एंजल इंगलिश स्कुल यांची मि. क्र. ६/००५६, ६/००५६/०१, ६/००५६/०२, ६/००५६/०३ व ६/००५७ या मिळकतीत शाळा आहे.

परंतु सदर एंजल इंगलिश मिडीयम स्कुल यांनी त्यांच्या मिळकती समोरील जागेत कोणत्याही प्रकारे PMRDA किंवा ग्रामपंचायतीची बांधकाम परवानगी न घेता बांधकाम सुरु केलेले आहे. या बाबत सदरचे बांधकाम त्वरीत थांबविणे बाबत ग्रामपंचायतीने एंजल स्कुल यांना नोटीस व पत्र व्यवहार दिनांक १३/०६/२०२३, २६/०६/ २०२३ व १६/०९/२०२३ या कालवधी मध्ये वेळोवेळी केलेला आहे. तसेच एंजल स्कूलचे सचिन अग्निहोत्री यांना ग्रामपंचायत ने लेखी स्वरूपात शाळेचे बांधकाम करू नये म्हणून लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला असूनही ग्रामपंचायत च्या नोटिशीला कराची टोपली दाखवून बांधकाम चालूच ठेवण्यात आले. त्यानंतर मा. गटविकास अधिकारी साो (उश्रे) पंचायत समिती हवेली यांना दिनांक १६/०९/२०२३ रोजी पत्र व्यवहार केलेला आहे. व मा. आयुक्त सो, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण पुणे यांना दिनांक १३/१०/२०२३ रोजी सदर बांधकामावर कारवाई करणे बाबत ग्रामपंचायत कडून पत्र व्यवहार करण्यात आला आहे.

सदरील आंदोलन हे “ऑल इंडिया पत्रकार संघ”पुणे शहर यांच्या वतीने करण्यात आले. त्यावेळी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक अमोल घोळवे यांनी ग्रामपंचायत ने एंजल स्कूल बरोबर केलेल्या पत्राव्यवहाराविषयी सविस्तर माहिती दिली त्यावेळी ग्रामपंचायत चे उपसरपंच नासीर खानपठाण, सामाजिक कार्यकर्ते सतीश काळभोर तसेच आंदोलक तुकाराम लांडगे, राम भंडारी, अमोल खोले,संजय आवारे,शहाजी मिसाळ, मगर उडानशिव, रुपाली काळभोर, सचिन सोनवले, इत्यादी कारकर्ते उपस्थित होते. त्यावेळी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक पवार, PSI तरटे, अजिंक्य जोजारे, यांच्या बंदोबस्तात आंदोलन पार पडले.