पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
पुणे : पुण्यातील लोहगाव परिसरात एका टोळक्याने
वाहनांची तोडफोड करीत राडा घातला आणि पसार झाले. Cctv फुटेज च्या आधारे आरोपिंच्या विमानतळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तसेच त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनादेखील पोलिसांनी पकडले आहे. त्यांनी परिसरातील 20 ते 25 वाहनांची तोडफोड केली.त्याप्रकारणी पोलिसांत त्यांच्याविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी हाशीम खलील शेख (वय 18, रा. लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, त्याच्या दोन अल्पवयींन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इनायत अली शौकत अली अन्सारी (रा. लोहगाव) यांनी तक्रार दिली. काल लोहगाव परिसरातील कलवडवस्ती भागात आजूबाजूला मध्यरात्रीच्या वेळी हातात कोयते व हत्यार घेऊन आलेल्या टोळक्याने अचानक रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्यांची तोडफोड केली होती. तर, लाथा घालून गाड्याही पाडल्या होत्या. मध्यरात्री हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. पोलिसांना याची खबर लागताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी लगेच धाव घेतली. परंतु पोलीस येईपर्यंत आरोपी पसार झाले होते.
पोलिसांनी शोध घेऊन हाशीम शेख याला अटक केली. त्याच्याकडून बाकीचे आरोपी मोकळ्या मैदानातील झाडीत लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलीस अंमलदार उमेश धेंडे यांना आरोपी हे ज्याठिकाणी मैदानातील झाडांमध्ये लपून बसले होते त्याठिकाणी जाऊन लागलीच पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्याठिकाणी दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून काही घातक शस्त्र व दुचाकी जप्त केल्या आहेत. सदरील कामगिरी वरिष्ठ निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विजय चंदन, पोलीस अंमलदार उमेश धेंडे, राकेश चांदेकर, सचिन जाधव, शैलेश नाईक यांनी केली आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.