हडपसर,वार्ताहर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ,भारताचे पहिले कायदामंत्री ,पत्रकार,लेखक,संपादक, विचारवंत, अभ्यासक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ वाचन,लेखन,चिंतन व मनन याच बळावर विश्वरत्न ठरले. “शिका,संघटित व्हा आणि चळवळ करा ” असा समाजाला त्यांनी कानमंत्र दिला. तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना करून इंग्रजी जुलमी राजवटीला आव्हान देऊन भारताच्या स्वातंत्र्यलढयात पुढाकार घेतला तसेच स्वातंत्र्यानंतरही त्यांनी समाजाची सेवा केली.अशा थोर महापुरूषांचे विचार आपण आचरणात आणावेत असे प्रतिपादन साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले. यानिमित्ताने सुजीत लांडगे,मयूरेश गायकवाड,यशराज धालगडे,अभय जाधव या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रतिश केंगले व दिपाली रणदिवे यांनी शिक्षक मनोगतात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या समग्र जीवनकार्याची आढावा घेतला.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव , उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,माधुरी राऊत,आजीव सेवक अनिल मेमाणे,सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता पाटील यानी केले.सूत्रसंचालन सविता पाषाणकर
यांनी केले.तर आभार वैशाली उफाड यांनी मानले.