पुणे

“बाजार समितीच्या संचालकांकडून ठराव करून खोतीदारांना मज्जाव – कुटुंबियांवर उपासमारीची वेळ… खोतीदारांचे पालकमंत्री अजित पवार यांना निवेदनातून साकडे”

पुणे (प्रतिनिधी )

कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे च्या मांजरी येथील कै.आण्णासाहेब मगर बाजार आवारात विद्यमान संचालक मंडळा कडुन खोतीदारांवर अन्याय होत असून बाजार समिती मध्ये अनागोंदी कारभार सुरु आहे, यामध्ये लक्ष घालून खोतीदार यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी बाळासाहेब भिसे यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन द्वारे केली आहे

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या निवेदनात बाळासाहेब भिसे यांनी म्हटले आहे, आम्ही गेली 35 वर्षापासुन हडपसर, पुर्व हवेली मधिल शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पालेभाज्यांचे फड खोतीदार म्हणुन खरेदी करतो व सदर माल काढणी मजुर, वाहतूक, बारदाना, सुतळी वापरुन काढुन आणुन विक्री करतो. या शेतमालाची विक्री पुर्वी हडपसर येथे असलेल्या मार्केट मध्ये व नंतर जागे अभावी बाजार समिती ने खरेदी केलेल्या मांजरी येथील कै.आण्णासाहेब मगर या 2010 साली स्थलांतरीत झालेल्या बाजारात विक्री करतो.या बाजार आवारात त्यावेळी आम्हाला हे शेतकरी मार्केट आहे आणि या ठिकाणी फक्त शेतकरीच माल विकणार असे सांगून अडवणूक झाली होती. परंतु त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री म्हणून अजित पवार यांना पत्र दिले, त्यावेळी प्रशासक शैलेश कोतमिरे आणि भारतीय किसान संघाचे शेतकरी प्रांताध्यक्ष माऊली तुपे व इतर सहकारी शेतकरी आणि आम्ही खोतकरी व व्यापारी संचालक यांच्यात चर्चा होऊन, आम्ही जो माल काढतो तो शेतकऱ्यांचाच आहे, शेतकऱ्यांकडे मजुरांची कमतरता व विभक्त कुटुंब पद्धती मुळे त्यांना अडचणी येतात. आम्ही त्यांना मदतच करतो व जागेवर व्यवहार करुन पुढिल सर्व जबाबदारी स्विकारुन त्याना घरपोच वेळेवर ठरलेल्या रक्कमा पण देतो. आणि आमच्या विरोधात काही तक्रारी पण नाहीत, त्यामुळे आम्हाला फक्त 2000 जुडी इतका माल विक्रीस परवानगी देण्यात आली. ती आतापर्यंत चालु होती आणि त्याची बाजार फि आम्ही रोज नियमा प्रमाणे भरत होतो. तसेच आमच्या विरोधात कोणाचीही फसवणुक केल्याची तक्रार आजतागायत नाही.

असे असताना देखील गेल्या 20 वर्षा पासुन बरखास्त असलेल्या बाजार समिती च्या झालेल्या निवडणुकीत नव्याने आलेले संचालक मंडळाने खोतीदारांची तडकाफडकी हाकालपट्टी केली. खोतीदारांनी तेथे धरणे आंदोलन केले ते आंदोलन चिरडण्यासाठी बाजार समितीचे कर्मचारी विरहित संचालकांच्या भावकि गावकिचे कार्यकर्ते व काही संचालक मनाला वाटेल तसे आमच्या गावाशिवा वरुन अगदी खालच्या भाषेत बोलुन आंदोलकांना हुसकावून काढत होते, त्यावेळी तुम्ही पुरंदरचे आहात पुरंदरला जा तिकडे च माल घ्या आणि तिकडेच विका, आम्ही सांगितले आम्ही या भागातील शेतकऱ्यांचे माल काढतोय यावर संचालकांनी अरेरावी करत आमच्या शेतकऱ्यांना तुमची गरज नाही असे सुनावले, आमच्या आंदोलकांच्या रोजी रोटी चा विषय असताना त्यांनी समजून न घेता ठराव करुन खोतीदारास या मार्केट मध्ये प्रवेश बंदी घातली.
तोडगा काढण्यासाठी आम्ही संचालक मंडळास भेटायला गेलो पण फार ताटकाळुन बसवुन ठेवले त्यानंतर संचालकांच्या समोर सभापती दिलीप काळभोर, प्रशांत काळभोर, सुदर्शन चौधरी यांनी पुन्हा झाफझाफ झाफले. आम्हाला तुम्हाला नाही घ्यायचे आत मध्ये तुम्हाला कुठे जायचे आहे तेथे जा असे सांगून हाकलले.
तीन महिने झाले कारवाई करून झाल्याने आयुष्यभराचा व्यवसाय बंद पडला त्यामुळे आमच्या मजुरांचे प्रश्न, ड्रायव्हर, घेतलेले कर्ज, भिशा,शेतकऱ्यांची देणी आमच्या विकलेल्या मालांच्या उधाऱ्या, घर खर्च, सर्व अडचणीत आलेले आहे त्यामुळे आम्हा खोतकऱ्यांच्या मनात नकारात्मक विचार येऊन आत्महत्या करावी असे वाटते. असेही बाळासाहेब भिसे यांनी म्हटले आहे,
आमच्यावर अवलंबुन असलेल्या शेतकऱ्यांचे माल शेतात काढणी वाचुन खराब होऊन गेलेत. त्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत,
एवढेच नव्हे तर संचालकांच्या आदेशावरून बाजार समितीने हकालपट्टी होण्या आगोदर काही व्यापाऱ्यावर टारगेट करुन कायद्याचा बडगा दाखवुन कारवाई करुन मे जुन महिन्यातील उन्हाळ्याची तेजीमधील मालाचे लिलाव करुन 20हजार 25 हजार रुपये आख्खे जप्त केले गेले, अतिशय दहशत बसल्याने व्यापारी घाबरले, या संधीचा फायदा घेऊन 1000, 1500, 2000 पर्यंतचे रोजच्या रोज हप्ते पण संचालकांच्या घरातील माणसांनी गोळा केले. त्याचे काही पुरावे पण उपलब्ध आहेत.
या बाजारातील इतर कारभाराची बातमी वर्तमानपत्रामध्ये मध्ये छापुन आली, त्याचे निमित्त करुन आमची हाकालपट्टी केली होती.
गेले तीन महिने सर्व खोतीदार संचालकांच्या दारोदार हिंडत आहेत पण फक्त पळवापळवी चालु आहे तुमचे काम होईल खोट्या आशा दाखविल्या जात आहेत.

 

कै. अण्णासाहेब मगर मार्केट मध्ये होतेय मनमानी…
या मार्केट मध्ये आपल्या जवळच्या लोकांना पाठवुन परवाना धारक खरेदीदार व्यापाऱ्यांना नियमा प्रमाणे दोन वाजे पर्यंत बाहेर थांबवुन, शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना पण त्रास होईलअसे नियम लावुन, उदा. कॅरेट मध्ये पालेभाज्या नाही आणायच्या,bडाग रचुन आणायच्या, आणलेल्या पालेभाज्यांची गरी लावायची, या त्रासाला वैतागलेल्या शेतकऱ्यां चे माल या संचालकांचे जवळचे लोक नियमबाह्य पद्धतीने खरेदी करुन तोच माल तेथे येणाऱ्या परवानाधारक व्यापाऱ्यांनाच दुप्पट, तिप्पट दराने विकतात. त्यामुळे नावारुपाला आलेले मार्केट खरेदीदारांची संख्या कमी झाल्याने उद्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
तसेच मी व इतर 1 खोतीदार व्यापारी बाजार समिती च्या व्यापारी प्र वर्गातुन निवडणुक लढलेलो आहे याचाही राग संचालक मंडळाने धरला आहे,

खोतीदार कुटुंबाची उपासमार होण्याच्या मार्गावर…
संचालकांच्या या कारभारामुळे खोतीदार व कुटुंबाची उपासमार चालु असल्याने मी हडपसर परिसरात भाजी मंडईत भीक मागुन या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
सभापती म्हणतात त्यावेळी प्रशासकांना नियम माहिती नव्हते, हा रायतु बाजार आहे. आम्ही त्यांना तेथे येऊ देणार नाही. त्यांनी इतर कोठेही माल घेऊन जावे, पालकमंत्री अजित दादा यांनी यामध्ये लक्ष घालावे
या संचालक मंडळात मागे बरखास्त झालेले लोक आहेत आणि त्यांचे सर्व कारणामे जगजाहीर आहेत. हा ठराव रद्द करून खोतीदारांना कै.अण्णासाहेब मगर उपबाजारात पुन्हा पूर्ववत सुरु करावे अशी मागणी या निवेदनात बाळासाहेब भिसे यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
पालकमंत्री अजित पवार याबाबतीत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.