पुणेमहाराष्ट्र

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने पिंगोरी येथे नव मतदार नोंदणी युवकांचा ध्यास – ग्रामीण व शहर विकास ही थीम असलेले विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उदघाटन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल. एम. पवार यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे अध्यक्षस्थानी होते.

” नेहमी सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवा व कष्ट करत रहा यश नक्की मिळेल, या श्रम संस्कार शिबिरातून स्वावलंबन, मैत्रीभाव, सहजीवन अशा अनेक गोष्टी शिकायला मिळतील. यातून आपला व्यक्तिमत्त्व विकास होत असतो. या गावातील, समाजातील विविध प्रश्न, समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठीची तत्परता अंगी बाळगावी ” असे प्रतिपादन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल. एम. पवार यांनी केले.

गावात पर्यावरण विषयक जाणीव जागृती निर्माण करून प्लास्टिक वापर टाळून प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण टाळू शकतो. आपण रस्त्यावर, इतरत्र टाकून दिलेले प्लास्टिक नदीवाटे समुद्रात मिसळते यामुळे सृष्टीचक्रात आपणच हस्तक्षेप करत असतो. त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो. ग्लोबल वॉर्मिंग वाढू नये यासाठी आपण कृती करूयात. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले.
सरपंच संदीप यादव यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत गावाविषयी माहिती दिली. अमोल शिंदे,उपसरपंच भाग्यश्री शिंदे, प्रकाश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

या शिबिरात पुढील सात दिवस श्रमदान, वृक्षारोपण, प्लास्टिक निर्मूलन, ऊर्जा बचत जागृती, ग्रामस्वच्छता, आरोग्य जनजागृती, व्यसनमुक्ती, बाल विवाह निर्बंध, व्यक्तीमत्व विकास, महिला सबलीकरण, प्रबोधपर पथनाट्य, नव मतदार जनजागृती, ग्राम सर्वेक्षण, अवयवदान मोहीम, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम असे उपक्रम घेण्यात येणार आहेत.

प्रसंगी उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ.सविता कुलकर्णी, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन लगड, डॉ. नाना झगडे, सरपंच संदीप यादव, उपसरपंच भाग्यश्री शिंदे, जीवन शिंदे, प्रकाश शिंदे, अमोल शिंदे, ज्योती शिंदे, सुषमा भोसले, अनिता शिंदे, मोहिनी कुदळे, शामराव शिंदे, शांताराम राणे, सचिन सातभाई, बाळासाहेब शिंदे, प्रा. गौरव शेलार, डॉ अंजू मुंढे, डॉ.वंदना सोनवले, प्रा. ऋषिकेश मोरे, प्रा. गणपत आवटे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. सविता कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड यांनी केले तर आभार प्रा. अंजु मुंडे यांनी मानले.