पुणे (प्रतिनिधी )
लोककल्याण प्रतिष्ठाणचे कार्य दिनदर्शिकेच्या माध्यमातून घरोघरी पोहचून निरंतर स्मरणात रहाणार आहे. असे प्रतिपादन श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे कार्याध्यक्ष विकास रासकर यांनी तुकाई दर्शन येथे श्री स्वामी समर्थ मंदिरात लोककल्याण प्रतिष्ठाण व पतसंस्थेच्या लोककल्याण दिनदर्शिका चे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी लोककल्याण प्रतिष्ठाण व पतसंस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ होले,कार्याध्यक्ष हरीश्चंद्र कुलकर्णी,उपाध्यक्ष दिलीप भामे,सचिव इंद्रपाल हत्तरसंग, पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरुण शिंदे,मार्गदर्शक प्रा.एस.टी.पवार,यशोधन रासकर,मच्छिंद्र पिसे,चंद्रकांत वाघमारे,पांडुरंग शेंडे,तुकाराम घोडके,प्रभाकर शिंदे,प्रविण होले,भुषण चव्हाण,मोरेश्वर कुलकर्णी,श्यामकांत पाटिल आनंद पाचागंणेआदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना लोककल्याण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजाभाऊ होले म्हणाले लोककल्याण दिनदर्शिका मोफत वितरणा बरोबरच प्रतिष्ठाण वर्षभर विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत असते.