हडपसर, पुणे – लायन्स क्लब ऑफ 21st सेन्चुरी यांच्या वतीने विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास २००० लिटर क्षमतेची सिंटेक्स पाण्याची टाकी भेट देण्यात आली.
शहरातील पाणी कपातीमुळे विद्यार्थ्यांची पाण्याची गैरसोय होवू नये.या उदात्त हेतूने हे कार्य केल्याचे लायन्स क्लबचे पदाधिकारी यांनी सांगितले.लायन चंद्रहास शेट्टी, लायन राजहंस सतीश, लायन प्रेसिडेंट माधुरी पंडित, लायन प्रसन्न भंडारकर, लायन रेखा शेट्टी, शारदा भांडारकर, शिवानी पंडित, पवन कुसुमा उपस्थित होते.
क्लबच्या प्रेसिडेंट माधुरी पंडित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या. यापुढे ही शाळेसाठी विविध प्रकारची मदत करणार असल्याचे सांगितले. तसेच येणाऱ्या १० वी व १२ वी च्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयातील शिक्षक रकटे सर यांच्या विशेष प्रयत्नातून लायन्स क्लबच्या मार्फत हा उपक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी गोरक्षनाथ केंदळे, मचीन्द्र रकटे, अरविंद शेंडगे, घनश्याम पाटील, युवराज देशमुख, वहिदा अवटी, श्रद्धा ससाणे, दीपा व्यवहारे, आशा भोसले, दीपाली जाधव, उज्वला पगारे, संगीता भुजबळ, कल्पना पैठणे, नलिनी गायकवाड आदी शिक्षकवृंद, तसेच कैलास वाडकर, लोखंडे नानी आदी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मचीन्द्र रकटे, यांनी केले.सूत्रसंचालन दीपा व्यवहारे यांनी केले तर आभार प्रदर्शन वहिदा अवटी यांनी केले.