पुणेमहाराष्ट्र

निवृत्ती नंतर विखुरलेले मोती पुन्हा एका माळेत गुंफले जातात

‘रोते हुये आते है सब, हसता हुआ जो जायेगा |
वो मुकद्दर का सिकंदर जाने मन कहलायेगा ||
हमने माना ये जमाना दर्द की जागीर है |
प्यार से जीते दिलोंको को, वो झुका दे आस्मान ||

जितेंद्र भरुक यांच्या गीतों का सफर गाण्याने कार्यक्रमाला सूरवात झाली आणि आपला आनंद गगनात मावेनासा झाला. कारण आपण सर्व ‘मुकद्दर’ प्रेमाने,एकमेकाना जिंकून घेतले आहे. असे समर्पक गाणे, त्याच्या प्रत्येक गाण्याला ठेका घेत आपले कानसेन तृप्त झाले. आपण कार्यक्रमाच्या प्रत्येक कलाकाराला दाद दिली.

कार्यक्रमाचे नियोजन इतके परिपूर्ण होते की सर्व जेष्ठ नागरिक व त्यांचे कुटुंबीय तल्लीन झाले होते . निमित्त होते ते किर्लोस्कर न्युमेटिक सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक संघाच्या ९व्या वर्धापन दिनाचे.

किर्लोस्कर न्युमेटिक सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक संघाचा हा ९ वर्धापन दिन वानवडी येथील महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवनात साजरा करण्यात आला. सातत्याने ९ वर्षे यशस्वीपणे सर्वश्री श्रीशैल जकुणे, नवनाथ झांजुर्णे, चंदकांत मांढरे यांनी हा उपक्रम राबविला आहे. यांचे मोलाचे योगदान आहे.

खरं तर निवृत्ती नंतर विखुरलेले मोती पुन्हा एका माळेत गुंफण्याच काम ही मंडळी करीत आहेत. त्यामुळे या त्रैमुर्तींच्या मुळेच हे एकत्रित रहाण्याचे भाग्य आपल्याला मिळत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही अशी बोलकी प्रतिक्रिया उपस्थित सुमारे शंभर जनांची होती. यावेळी किर्लोस्कर न्युमेटिक मधील मुख्य अधिकारी गणेश चौधरी, नितीन एकतपुरे, कामत, डॉ.मिजार, जाधव उद्योजक विलास बाबर, कृष्णात अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी निवृत्ती नंतरही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

एवढ्यावरच ही मंडळी थांबलेली नाही तर आरोग्य विषयक हेल्थ चेक अप, धावणं , गड किल्ले यासह ट्रेकिंग आदी उपक्रम राबविण्यात ही तरुणतुर्क मंडळी यशस्वी झाले आहेत.

दरमहिन्याच्या दुसऱ्या रविवार ही मंडळी लोहिया उद्यानात एकत्रित जमून सुखदुःखाच्या गोष्टी, वाढदिवस साजरे करतात.

सुधीर मेथेकर/राजन जोशी