पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
पुणे : हडपसर येथील ऍनिमल फ्रेंड्स फाउंडेशनचे सदस्य कुणाल चौरे याला महम्मदवाड़ी देसाई हॉस्पिटल समोरील लोकवस्ती मधून सर्प पकड़ण्याकारिता फ़ोन आला आणि सांगितले की आमच्या वस्ती मधे एक सांप आहे व त्याच्या तोंडातून रक्त येत आहे अशी माहिती मिळाली. सदरील माहिती मिळताच ऍनिमल फ्रेंड्स फाउंडेशनचे टीमचे सदस्य कुणाल चौरे, गणेश अवचिते, सुमित मोरे, अभिजीत चव्हाण, करण भांडे, यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली व लोकेशन वर पोहोचले तेंव्हा त्यांना त्याठिकाणी अतिशय दुर्मीळ असणारा मांडूळ जातिचा सांप जखमी अवस्थेत तेथे आढ़ळून आला.
त्याला पकडून सुरक्षितपणे वन परिक्षेत्र पुणे वनविभाग वानवड़ी फ़ॉरेस्ट ऑफिस या ठिकाणी पुढील उपचारासाठी (RFO) यांच्या ताब्यत दिले. ऍनिमल फ्रेंड्स फाउंडेशन च्या टिमने अतिशय दुर्मिळ सापास जीवदान दिल्यामुळे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे.अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष अनिकेत कांबळे यांनी दिली. तसेच सर्व प्रकारचे वन्य प्राणी पक्षी जखमी अवस्थेत आढळून आल्यास ऍनिमल फ्रेंड्स फाउंडेशनशी संपर्क साधावा असे आव्हानही करण्यात आले त्यासाठी त्यांनी खालील मोबाईल नंबर दिले आहेत.9325983316,7720012103