पुणे

विद्यार्थ्यांनी कायद्याच्या शिक्षणाकडे वळावे प्रा.डाॅ.गोविंद सिंग; एमआयटी एडीटी विद्यापीठातील विविध कोर्सेसला बार काैन्सिलची मान्यता…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

नाशिक,दि.२०- कोणत्याही क्षेत्रात कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागले, की सर्वांना गरज पडते ती वकिलांची! खासगी असू दे किंवा सार्वजनिक क्षेत्र; प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा वकिलांची आवश्यकता भासत असतेच. फक्त कंपन्या किंवा सरकारी कार्यालयेच नाही तर वैयक्तिक पातळीवरही कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी याच वकीलमंडळींची मदत घ्यावी लागते. म्हणूनच आज कायद्याचा अभ्यास केलेल्या पदवीधरांना करिअरच्या अनेक संधी निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन एमआयटी आर्ट डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या ‘स्कुल ऑफ लाॅ’चे सहाय्यक प्रा.डाॅ.गोविंद सिंग यांनी केले.

ते एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या वतीने आयोजित प्रत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी एमआयटी एडीटी विद्यापीठ ‘स्कूल ऑफ लॉ’तर्फे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या पाच वर्षांचा बीबीए- एलएलबी, तीन वर्षांचा एलएलबी, दोन वर्षांचा एलएलएम, एक वर्षांची लीगल जर्नालिझम पदविका आदी कोर्सेची माहिती दिली.
डॉ.सिंग पुढे बोलताना म्हणाले की,
एमआयटी एडीटी विद्यापीठ हे प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा.डॉ.मंगेश कराड यांच्या दूरदृष्टीने साकारलेले व विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच भविष्यातील नोकऱ्यांची संधी ओळखून कौशल्यावर आधारित शिक्षण देणारे विद्यापीठ आहे. आमचे हजारों विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. १२५ एकरमध्ये पसरलेला विद्यापीठाचा कॅम्पस जागतिक पातळीवरील विविध सोई -सुविधांनी असा सुसज्ज आहे. यासह विद्यापीठाचा ‘स्कूल ऑफ लॉ’ देखील अधिष्ठाता डॉ.सपना देव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना कायद्याच्या शिक्षणातील विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द आहे.

 

लॉ करण्यासाठी तसेच विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी या बाबत अधिक माहिती आणि मार्गदर्शनसाठी इथे संपर्क करावा ७३९१०९५१९३. ई-मेल :solj@mituniversity.edu.in

-कोट –
कायदा समजून घेणे , त्या प्रोफ़ेशन मधून पैसे तर कमावता येतातच पण कायद्याचे ज्ञान असल्यामुळे कुठल्याही अडचणीचे उत्तर मिळविण्याची कुवत विद्यार्थ्यामध्ये येते. कायदेशीर सल्ला देऊन किंवा इतर पद्धतीने सुद्धा समाजसेवा होते, त्यामुळे कायद्याचे शिक्षण हे महत्त्वाचेच!
– डॉ.सपना देव,
अधिष्ठाता, स्कूल ऑफ लॉ,
एमआयटी एडीटी विद्यापीठ, लोणी-काळभोर, पुणे