पुणेमहाराष्ट्र

विठ्ठलराव शिवरकर विद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न

हडपसर पुणे : विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भरतशेठ धर्मावत (व्हा.चेअरमन – सन्मित्र सहकारी बँक, पुणे), यांच्या शुभहस्ते शंभूशेठ जांभूळकर ( प्रो.प्रा. – जांभूळकर गार्डन, वानवडी, पुणे), यांच्या अध्यक्षतेखाली दत्तोबा जांभुळकर सरपंच – वानवडी गाव ट्रस्ट, माजी राज्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर, सचिव चंद्रकांत ससाणे सर, प्राचार्य लहू वाघुले सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.

 

याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत सादर केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष शंभूशेठ जांभूळकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांनी शाळा स्थापनेसाठी शिवरकर साहेबांनी घेतलेल्या कष्टाची चीज करावी,जास्तीत जास्त शिक्षण घेवून आपल्या कुटुंबाचे, शाळेचे, संस्थेचे व देशाचे नाव मोठे करावे. तसेच व्यासपीठावरील सर्व गुरुजनांबद्दल आदर व्यक्त केला.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या व सर्व पाहुण्यांचा परिचय करून शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागतपर सन्मान केला. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे कौतुक केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या क्रांतीकारकांची व समाजसुधारकांची आठवण करून त्यांच्या कार्याचा परिचय दिला.तसेच अनेक स्वातंत्र्यसैनिक व थोर नेते यांच्याही कार्यांना उजाळा दिला. त्यांची आठवण व कार्य याचा परीचय मुलांना व्हावा यासाठी या थोर व्यक्तींची व्याख्याने आयोजित करणेबाबत सांगितले. विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श ठेवून कष्ट करून आईवडील, शाळेचे व देशाचे नाव मोठे करावे, असे सांगितले.

 

सन्मित्र बँकेचे मा.व्हा.चेअरमन भरतशेठ धर्मावत यांनी आपल्या भाषणात असे सांगितले की आपले राष्ट्रीय सन हे मोठ्या उत्साहात साजरे झाले पाहिजे.आज सगळीकडे जातीवादाचे राजकारण असून विद्यार्थ्यांनी जातीभेद दूर करून धर्मनिरपेक्षतेने देशाची सेवा करावी व देशाचे नाव मोठे करावे असे सांगितले.
याप्रसंगी कै. सुवर्णा चौघुले यांच्या स्मरणार्थ विजय चौघुले यांनी विद्यालयातील गरीब, हुशार, गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय बूट वाटप केले. तसेच शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धा विजेते संघ व वैयक्तिक स्पर्धा पारितोषिक वितरण करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थी क्रिश पवार याने उत्तम पियानो वाजविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर (माजी राज्यमंत्री) व कार्यक्रमाचे अध्यक्ष शंभूशेठ जांभूळकर यांच्या वतीने कौतुक व रोख रकमेचे बक्षीस देण्यात आले.तसेच सोमनाथ जोगदंड याने उत्कृष्ट हलगी वादन केल्याबद्दल व इयत्ता 11 वी कला शाखेतील विद्यार्थिनी अनुजा चव्हाण हिने प्रजासत्ताक दिनाबद्दल केलेल्या भाषणाचे रोख रकमेची बक्षीस देवून कौतुक केले.

 

या प्रसंगी माजी नगरसेविका कविताताई शिवरकर, तसेच मायाताई ससाणे,सोनाली परदेशी, डॉ.गौरी धारिवाल, सन्मित्र बँकेचे चेअरमन सुनील गायकवाड, दीपक केदारी, सिद्धार्थ परदेशी, रिपूदमन धारिवाल, रमेश काकडे, दिनेश गिरमे, सचिन गिरमे, दत्ता जाधव, सुदाम जांभूळकर, अनिल गवळी, भरत राऊत, पुंडलिक गवळी, चंद्रकांत तोंडारे, बाळासाहेब हिंगणे, अशोक शिवरकर, रहमान शेख, गणेश शिवरकर,मनोज शिवरकर, सुरेश शिवरकर, अजिंक्य शिवरकर, दिनेश ओव्हाळ, अनंतराव शिवरकर, प्रा.संतोष जाधव, नवाब भाई शेख, रेवा अहिर, रमेश गायकवाड, सिद्धांत परदेशी, दत्ता डूरे, विजयराव चौधरी, यशवंत झगडे, प्रमोद काकडे,रेखा कटारनवरे, प्राचार्य लहू वाघुले सर, ग्रामस्थ, पालक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य लहू वाघुले सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा व्यवहारे यांनी व आभार प्रदर्शन माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी केले.