हडपसर पोलिसांची कामगिरी ः
पुणे, दि. ३० ः जबरी चोरीचा बनाव करणाऱ्यांना सूत्रांच्या माहितीनुसार अवघ्या २४ तासांत पुणे-मुंबईतून जेरबंद केले. वसीम युनूस खान (वय २७, रा. घास बाजार, बांद्रा टर्मिनस, बांद्रा, मुंबई, मोहम्मद मेहफूज शौकत खान (वय २५) मोहम्मद साकिब अय्याज खान (वय २४), गुफरान मिराज खान (वय २३, तिघे रा. गोवंडी, शिवाजीनगर, मुंबई) अशी अटक केल्लयांची नावे आहेत. आरोपीकडून १२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी ब्रिजेशकुमार राजमनी तिवारी (वय ३९, रा. जोगेश्वरी वेस्ट, मुंबई) यांनी हडपसरपोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा टेम्पोचालक मालक घेऊन२८ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वा. हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, सुहाना चौक येथे माल घेऊन जात असताना अनोळखींनी अडवून टेम्पोतील माल आणि मोबाईल हँडसेट चोरून नेला. फिर्यादीच्या कामगार वसीम खान आणि त्याचा भाऊ मेहफस खान याच्याकडे कसून कपास केला असता त्यांनी गोवंडी येथील सहकाऱ्यांच्या संगमताने टेम्पो व मालाचे अपहरण करून मुंबईला पाठविल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला पकडून अटक करीत १२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, संदीप शिवले यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतिबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, अनिरुद्ध सोनवणे, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलिक केसकर, रामदास जाधव, अमित साखरे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.