मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे व इतर मागण्यासाठी सकल मराठा समाज,मराठा क्रांती मोर्चा आक्रमक होत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवली सराटी ते आझाद मैदान मुंबई पायी मोर्चा निघाला. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मोर्चा मुंबईच्या वेशीवर वाशी येथे पोहचला असताना याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सकारात्मक चर्चा करत ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे.
त्यांच्या सर्व पितृसत्ताक रक्त नातेवाईकांना,सगे सोयाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील वंचित घटकाला याचा फायदा होणार आहे. शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीदिनी एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठा समाजाला आरक्षण बहाल केले आहे,या शासन निर्णयाचे स्वागत करीत पुण्यात शिवसेनेकडून फटाक्यांची आतषबाजी करीत, गुलाल उधळून,एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला .यावेळी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, प्रकाश तरवडे,नाना तरवडे,विक्रम घाडगे,सचिन भानगिरे,संदीप घुले, निवृत्ती तरवडे,संतोष रजपूत,दत्ता भानगिरे,अण्णा भानगिरे,रवींद्र भानगिरे , आकाश भानगिरे, मयुर तरवडे PMPML चे विजय पांढरे व असंख्य मराठा बांधव उपस्थित होते.