“माझा मराठीचि बोलु कौतुके परि अमृतातेही पैजा जिंके”,…. “माझ्या मराठी भाषेचा लावा ललाटास टिळा,”…. “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” यासह ज्ञानोबा – तुकोबोच्या गजरात माय मराठीच्या ग्रंथदिंडीने परिसर दुमदुमला.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील मराठी विभागाने आयोजित केलेल्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त महादेवनगर परिसरात ग्रंथदिंडी काढून पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. विध्यार्थांनी केलेली पारंपरिक व महापुरुषांची वेशभूषा हे या ग्रंथदिंडीचे आकर्षण ठरले. या प्रसंगही प्रमुख पाहुणे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुरशे घुले, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे याच्या उपस्थितीत ही दिंडी निघाली. खेळ, फुगड्या घालत फेर धरला यात विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी दंगले.
मराठी भाषा ही आपली मातृभाषा असून मराठी संस्कृती बरोबर ती उदयाला आली आहे. या भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि आपण तिचे संवर्धन केले पाहिजे. असे मत महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुरशे घुले यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा अधिक समृद्ध व्हावी तिचे संवर्धन व्हावे मराठी भाषा ही वैशिष्ट्येपूर्ण असून कोसाकोसांवर मराठी भाषा बदलते. या बोलींमध्ये मराठीचे वैभव आहे. अभिजात भाषेसाठी लागणारी सर्व वैशिष्ट्ये मराठी भाषेत आहेत तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे असे मत प्राचार्य तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रवीण ससाणे, डॉ. नाना झगडे, डॉ. अशोक ससाणे, प्रा. नितीन लगड, डॉ. वंदना सोनवले, प्रा. अनिता गाडेकर, डॉ. शरद गिरमकर, प्रा. भाऊसाहेब भोसले, चंद्रकांत साठे आदी उपस्थित होते.
वेदांत आवडे, किरण चंदनशिवे, मनाली सायकर, धीरज जुडे, विजय यादव, ऋतिका काळभोर, कमलेश खंडागळे, दर्शक सागडे, पूनम जवळकर, रिद्धी शिंदे, मुस्कान पठाण या विद्यार्थ्यांनी या ग्रंथदिंडीचे संयोजन केले.
प्रास्ताविक डॉ. प्रवीण ससाणे यांनी केले. सूत्रसंचालन वंदना सोनवले यांनी केले तर आभार प्रा. अनिता गाडेकर यांनी मानले.