पुणे

“चर्चेत तोडगा न निघाल्याने बाळासाहेब भिसे यांचे उपोषण सातव्या दिवशी सुरूच… “हडपसर मार्केट कडकडीत बंद, उपोषण आंदोलनास वाढतोय पाठिंबा…

पुणे (प्रतिनिधी – स्वप्नील अप्पा कदम)

कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निणर्याविरोधात व खोतीदार बाळासाहेब भिसे यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हडपसर मार्केटमधील कष्टकरी व्यापारी व पथारी व्यावसायिकांनी उत्स्फूर्त बंद पाळून निषेध व्यक्त केला. किरकोळ व्यापाऱ्यांनी माल खरेदी केलाच नाही.संचालक सुदर्शन चौधरी यांनी दिलेल्या चिथावनी मुळे शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या अन बाजारातील वातावरण दूषित झाले होते. उपोषणास पाठिंब्यासाठी पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना हडपसर, हडपसर पथारी संघटना यांनी उस्फुर्त बंद पाळला.

https://youtu.be/pQ3rj5h3HqUhttps://youtu.be/pQ3rj5h3HqU

दरम्यान माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष (शरद पवार गट ) प्रवीण तुपे, अजित पवार गटाचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, साहेबराव काळे, राष्ट्रवादी वैद्यकीय जिल्हाध्यक्ष निनाद टेमगिरे, संजय शेवाळे, काँग्रेस ओबीसी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे, यशवंत साळुंके, प्रशांत मामा तुपे, दिलीप टकले, गणेश फुलारे, बाळासाहेब हिंगणे, योगेश गोंधळे यांनी बाळासाहेब भिसे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.

https://youtu.be/H0dIVxofGhUhttps://youtu.be/H0dIVxofGhU

प्रशासन व आंदोलक यांच्यातील चर्चा अयशस्वी….

मांजरी उपबाजारात मज्जाव केल्याने शेतकरी बाळासाहेब भिसे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे, या आंदोलनाची दखल घेऊन संचालक मंडळाने अटी टाकून परवानगीचे पत्र दिले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर, विभागप्रमुख किरण घुले यांनी उपोषणकर्ते बाळासाहेब भिसे यांची भेट घेतली, आम्ही अटी शिथिल करू उपोषण मागे घ्या असे आवाहन केले पण खोतीदार बाबत निर्णय घ्या अटी शिथिल करून पत्र द्या मग उपोषण मागे घेतो अशी भूमिका भिसे यांनी घेतली. शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे यांनी बाजार कार्यालयात संचालक सुदर्शन चौधरी व व्यवस्थापन यांच्याशी चर्चा केली.

https://youtu.be/wRWJthWhB2Ahttps://youtu.be/wRWJthWhB2A

भिसे यांनी न्याय्य मागण्यांसाठी सूरु केलेल्या आंदोलनास पाठिंबा असून पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याची मागणी करणार असल्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी यावेळी सांगितले.

भिसे यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली, सर्व स्तरातून त्यांना पाठिंबा वाढत चालला आहे, संचालक मंडळाने तातडीची बैठक घेऊन निर्णय घ्यावा म्हणून दबाव वाढत चालला आहे.

https://youtu.be/KmNGqAxRsOshttps://youtu.be/KmNGqAxRsOs