कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने खोतीदारांना मांजरी उपबाजारात परवानगी दिल्यानंतरही संचालक सुदर्शन चौधरी काही मुठभर लोकांना हाताशी धरून मार्केटचे वातावरण दूषित करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्याची बाजू मांडण्याचा आव आणून थेऊरच्या यशवंत साखर कारखाना निवडणुकीचे राजकारण रंगवण्याचा डाव शिजतोय काय?
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्व.अण्णासाहेब मगर मांजरी उपबाजारात खोतीदारांना मज्जाव केल्याने उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते परंतु संचालक मंडळाने वाटाघाटी करून खोतीदारांच्या मागण्या मान्य करून त्यांना परवानगी दिली सर्व संचालक मंडळाची या निर्णयास मान्यता असताना संचालक सुदर्शन चौधरी मात्र पहिल्या दिवसापासून विरोध करत आहेत, मांजरी उपबाजारात शेतकरी व्यापारी यांना एकत्र घेऊन रोज घोषणाबाजी केली जात आहे चिथावणी देऊन खोतीदार व्यापाऱ्यांविरोधात वातावरण निर्मिती केली जात आहे, त्यामुळे छोटे – शेतकरी मोठे शेतकरी व खोतीदार यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत, संचालक चौधरी हे तेथील शेतकऱ्यांना मीच शेतकऱ्यांच्या वाली आहे, तुमच्या मालाला माझ्यामुळे भाव मिळणार आहे, संचालक मंडळाने चुकीचा निर्णय घेतला आहे संचालकांचा मी निषेध करतो ज्यांनी व्यापाऱ्यांची बाजू घेतली त्यांना या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जाब विचारा मतदान करू नका असे सांगून कारखाना निवडणुकीचे राजकारण मार्केटमध्ये आणून संघर्ष निर्माण करण्याचा डाव आखला जात आहे, खोतीदार व्यापाऱ्यांना परवानगी दिलेली असताना खोतीदारांना मार्केटमध्ये येऊ देऊ नका त्यांच्या गाड्या फोडा असे सांगितले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
बाजार समितीत पक्षी राजकारण कशाला? शेतकरी संतप्त….
कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी, व्यापारी व ग्राहकांसाठी असून येथे सर्व घटकांना रोजगार मिळतो संचालक मंडळाने बहुमताने मान्यता दिल्यानंतरही संचालक सुदर्शन चौधरी या मार्केटमध्ये पक्षीय राजकारणाची जोड देत आहे व बाजार समितीचा व्यापार व कारखाना निवडणुकीचा काही संबंध नसताना येथे चिथावणीखोर भाषणे देऊन शेतकरी आणि खोतीदार व्यापारी यांच्यात संघर्ष करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
खोतीदारांना बाजार समितीच्या प्रशासनाकडून संरक्षण दिले जाईल असे सचिव राजाराम धोंडकर यांनी सांगितले असले तरी प्रत्यक्षात एका संचालकामुळे येथील वातावरण चिघळल्याचे चित्र आहे. या संचालकास सभापती व संचालक मंडळ समज देणार का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.