हडपसर, पुणे : विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये रिफ्लेक्शन फाऊंडेशनच्या वतीने “शोध किशोर मनाचा” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयाचे प्राचार्य लहू वाघुले सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
रिफ्लेक्शन फाउंडेशनच्या वतीने इयत्ता 8 वी व 9 वी च्या वर्गातील मुले व मुलींसाठी जागृतीपर व्याख्यान समुपदेशिका मुक्ता खांडेकर व प्राजक्ता सहस्त्रबुद्धे यांनी दिले.
वयात येताना होणारे शारीरिक, भावनिक, मानसिक, सामाजिक बदलांमुळे होणारी मनाची अवस्था, घडणाऱ्या चुका इत्यादी ची माहिती विविध उदाहरणांद्वारे दिली. मैत्री, प्रेम, आकर्षण यांतील फरक ही सोप्या भाषेत समजावून सांगितला. मैत्री कोणाशी करावी? खरे मित्र कोण? व्यसनी मित्रांमुळे आयुष्य कसे उद्धवस्त होते, याची विविध उदाहरणे सांगितली. तसेच ध्येय निश्चितेचे महत्त्व सांगितले.व्याख्यानानंतर मुलांच्या शंकांचे निरसन केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांची पूर्व चाचणी व उत्तर चाचणी घेण्यात आली.
कार्यक्रमास प्राचार्य लहू वाघुले सर, गोरक्षनाथ केंदळे, अरविंद शेंडगे, युवराज देशमुख, वहिदा अवटी, श्रद्धा ससाणे, दीपा व्यवहारे, आशा भोसले, दिपाली जाधव, उज्वला पगारे, संगीता भुजबळ, कल्पना पैठणे, नलिनी गायकवाड आदी शिक्षकवृंद, कैलास वाडकर, विवेक कांबळे, लोखंडे नानी आदी शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन दीपाली जाधव मॅडम यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन दीपा व्यवहारे मॅडम यांनी केले.