पुणेमहाराष्ट्र

वेकअप पुणेकर चळवळीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्वारगेट चौकात जाणून घेतल्या समस्या -संयोजक मोहन जोशी

पुणे – शहरातील नागरी प्रश्नांची सोडवणूक पुणेकरांमार्फतच व्हावी, या हेतूने सुरू केलेल्या या चळवळीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संयोजक मा. आ. मोहन जोशी यांनी आज (गुरुवारी) दिली.

या चळवळी अंतर्गत ट्रॅफिक हा विषय प्राधान्याने घेतला असून दि.५ पासून ‘अडकलाय पुणेकर’ या मोहीमेला प्रारंभ करण्यात आला. स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठका, सूचना, पुणेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी स्वयंसेवकांना मार्गदर्शन, लोकांमध्ये जावून काम सुरू करणे अशा पद्धतीने मोहीम सुरू करण्यात आली आहे. ट्रॅफिक बाबतच्या समस्या आणि उपाययोजना पुणेकरांनीच सुचवाव्यात यासाठी शहरभर प्रश्नावली भरून घेण्यात येत आहेत. विविध चौकांमध्ये ‘वेकअप पुणेकर’ च्या प्रश्नावलीचा क्यूआर कोड स्कॅन करून पुणेकर अभिप्राय देत आहेत. मोहीम सुरू झाल्यापासून बहुसंख्य पुणेकरांनी ट्रॅफिक सुधारण्याविषयी अभिप्राय दिलेले आहेत, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली.

पोलीसांच्या वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त खाडे तसेच स्मार्ट सिटी चे इंजिनिअर्स यांच्या समवेत स्वारगेट चौकातल्या वाहतूक समस्यांबद्दल तात्काळ मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्यात आली. तसेच स्वारगेट चौकात फेसबुक लाइव्ह करून नागरिकांकडून समस्या जाणून घेण्यात आल्या, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली आहे.

स्वारगेट चौकातील ‘अडकलाय पुणेकर’ या मोहीमेत दत्ता बहिरट, प्रथमेश आबनावे, सुरेश कांबळे, आयुब पठाण, प्रशांत सुरसे, शाबीर खान कान्होजी जेधे, प्रथमेश लभडे, अविनाश अडसूळ, आशिष व्यवहारे, साहिल भिंगे, सागर कांबळे, गोरख पळसकर, बाबा सय्यद, सचिन बहिरट, रवी पाटोळे, तिलेश मोटा, अनिकेत सोनवणे, नरेश धोत्रे, स्वाती शिंदे, शोभा पनीरकर, मनीषा गायकवाड, जयश्री पारक, अनिता मखवाणी, रेखा जैन सुनिता नेमूर, ज्योती आढागळे, वनिता सुबकडे, सोनू शेख, कुमार शिंदे, अशोक गायकवाड, जयकुमार ठोंबरे पाटील, दिपक ओव्हाळ, अशोक नेटके, रामविलास माहेश्वरी, पुष्कर आबनावे, भरत सुरना आदी सहभागी होते.