पुणे, दि. ९ ः हडपसरमधील म्हाडा सोसायटीतील ख्वाजा गरीब नवाज मस्जिदीजवळ गळ्याला धारधार लोंखडी हत्यार लावून ४ हजार रुपये लुटणाऱ्या टोळीवर मकेकांतर्गत कारवाई करण्यात आली. टोळीप्रमुख अमन संजय दिवेकर (वय २४, रा. जैननगर, बिबवेवाडी, पुणे, मूळ गांव- दौंड, जि. पुणे), विशाल संजय लोखंडे (वय २४, रा. इंदिरानगर, अप्पर डेपो, बिबवेवाडी, मूळ गांव-उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे असून, एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. नवनिर्वाचित पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.
पोलिसांनी सांगितले की, अमन संजय दिवेकर (टोळी प्रमुख) याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असून, बेकायदेशीर मार्गाने बिबवेवाडी, काळे-पडळ, म्हाडा कॉलनी हडपसर, सय्यदनगर परिसरात दहशत निर्माण केली आहे.
हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी पोलीस उपायुक्त आर. राजा यांचे मार्फत अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर,अश्वीनी राख करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, संदिप शिवले, सहायक पोलीस निरीक्षिका सारिका जगताप, दोरकर, पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, महेश उबाळे, वसीम सय्यद, गिरीश एकोर्गे, बाबा शिंदे, रामेश्वर नवले यांच्या पथकाने ही कारवाई केली.