Uncategorized

“पुणेकरांनो सावधान.. खतरे में संविधान ! – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा पुण्यात एल्गार…

पुणे (प्रतिनिधी)
सरकारी आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या गुंडांनी पुण्यात केलेला लोकशाहीचा खून सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितला. “निर्भय बनो” चे कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर त्यांनी जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे कार्यकर्ते सरसावले तेव्हा गुंडांनी महिला, युवती कार्यकर्त्यांची मर्यादा न पाळता सर्वांवरच हल्ला केला.

या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने बालगंधर्व चौक येथे आंदोलन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, मोदी सरकार चले जाव, पुणेकरांनो सावधान खतरे में है संविधान अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
“माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारांनी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी समृद्ध अशा पुण्यभूमीत, विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या पुणे शहरात काल हुकूमशाहीची दहशत सर्वांनीच अनुभवली. सत्तेत असलेल्या महायुतीच्या तीनही पक्षांच्या गुंडांकडून ज्येष्ठ पत्रकार निखिल जी वागळे, ॲड. असीम सरोदे, विश्वंभरजी चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

आपल्या डोळ्यांसमोर पुरोगामी विचारांवर प्राण घातक हल्ला होतो हे पाहून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वयं स्फूर्तीने त्यांना सुरक्षा पुरवली. यानंतर चौथाळलेल्या महायुतीच्या गुंडांनी आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला, महिला भगिनींवर युवती कार्यकर्त्यांवर निर्लज्जपणे हात उभारला. या दडपशाहीला न घाबरता यापुढेही पुणे शहरात जिथे अन्याय दिसेल तिथे आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा सच्चा कार्यकर्ता न्यायासाठी उभा असेल.” अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली.

या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रवींद्र माळवदकर, डॉ.शशिकांत कदम, उदय महाले, मयूर गायकवाड,  रूपालीताई शिंदे, भक्त्ति कुंभार, पायल चव्हाण, ऋतुजा देशमुख, ज्योतीताई सूर्यवंशी, नीताताई गलांडे, आसिफ शेख, सुवर्णाताई माने, जावेद शेख, मंगलताई पवार यासह सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासह पुरोगामी विचारांवर निष्ठा असणारे सामान्य पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.