पुणेमहाराष्ट्र

दरोड्याच्या तयारीतील टोळीला ठोकल्या बेड्या स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखा व सुपा पोलीस स्टेशनची कामगिरी

पुणे, दि. १४ ः दरोड्याच्या तयारीतील टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून गावठी पिस्टल, मिरची पावडर, अॅडजेटेबल पाना, मोबाईल, ४ पिकअप, गॅस पाईपसह वाहने कट करण्याचे ग्लॅन्डर असा १२ लाख ९६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गणेश चंद्रभान गायकवाड (रा. खांडगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), अजित अरूण ठोसर, गोविंद शिरसाठ (दोन्ही रा. मातकुळी, ता. आष्टी, जि. बीड), सीमा रावसाहेब गायकवाड (रा. बस स्टॅन्ड पाठीमागे फर्निचर दुकानजवळ जालना) आणि अजित ठोसर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

पोलिसांनी सांगितले की, सुपा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील आणि त्यांचे सहकारी गस्तीवर होते. त्यांना सुपे गावामध्ये अमेझ कार फिरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेत संशयित होंन्डा अमेझ कारला सासवड चौकामध्ये हात दाखवून थांबविली, त्यावेळी कारमध्ये चार पुरूष व एक महिला तोंडाला रूमाल बांधलेले दिसून आले. अधिक तपास केला असताना कारमध्ये लोखंडी अॅडजेस्टेबल पाना कारमधून बाहेर टाकून गाडी चालु करून मोरगावचे दिशेने पळुन गेला. दरम्यान, कारमधून उतरवलेल्याकडे चौकशी केली असता गणेश चंद्रभान गायकवाड (रा. खांडगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) याच्याकडे गावठी पिस्टल, मोबाईल, प्लॅस्टिक पिशवीमध्ये मिरचीची पावडर मिळून आली. साथीदारांसह टोळी दरोडा टाकण्याचे उद्देशाने तयारीने आल्याचे तपासात उघडकीस आले. आरोपीने साथीदारांच्या मदतीने सांगवी बारामती, मिरजगांव, बेलवडी, (अहमदनगर) फलटण या परिसरातून वाहनांची चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींवर माळेगाव, मिरजगाव, बेलवडी, फलटण, सटाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

 

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमित सिद पाटील, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलीस अमंलदार बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे, अजय घुले, राहुल भाग्यवंत, रूपेश साळुके, संदिप लोंढे, महादेव साळुके, किसन ताडगे, निहाल वनवे होमगार्ड खोमणे, भोसले यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.