पुणेमहाराष्ट्र

विठ्ठलराव शिवरकर विद्यालयास इकोसॅन कंपनीच्या वतीने स्वच्छतागृहाचे अद्यावतिकरण संपन्न

हडपसर, पुणे : विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये इकोसॅन सर्व्हिसेस फाउंडेशनच्या वतीने अद्यावत स्वच्छतागृह तयार करून देण्यात आले.माजी नगरसेविका कविता ताई शिवरकर यांच्या शुभहस्ते फित कापून स्वच्छतागृहाचे उदघाटन करण्यात आले. तसेच इकोसॅन फाउंडेशनचे सिव्हिल इंजिनियर गणेश काळे यांच्या शुभहस्ते माजी नगरसेविका कविताताई शिवरकर व माजी नगरसेवक अभिजित शिवरकर, प्राचार्य लहू वाघुले सर यांसकडे स्वच्छतागृहाचे हस्तांतरण करण्यात आले.

 

याप्रसंगी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात माजी नगरसेविका कविताताई शिवरकर यांनी असे सांगितले की, विद्यार्थी हे अधिक वेळ शाळेत असल्यामुळे शाळेतील वातावरण प्रसन्न असावे लागते, स्वच्छतेच्या सुविधा असाव्या लागतात. या उपक्रमासाठी आपल्या शाळेची निवड केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.तसेच इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
सिव्हिल इंजिनियर गणेश काळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्वच्छतेमुळे आरोग्य व आरोग्यामुळे लक्ष्मी रहाते, असे सांगितले.नवीन तंत्रज्ञानामुळे मेंदू प्रगल्भ होतो, त्याच्या उपयोगाने आपले वातावरण, परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, असे सांगितले.स्वच्छतेचे महत्त्व सांगून हात धुण्याचे महत्त्व सांगितले.संस्थेने दिलेल्या सुविधांचा वापर व्यवस्थितपणे करावा, ही अपेक्षा व्यक्त केली.तसेच या संस्थेच्या वतीने वर्षभर पुरेल इतके साहित्य दिल्याचे सांगून संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांची माहिती दिली व या स्पर्धांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी ही सहभाग घ्यावा, अशी इच्छा व्यक्त केली.

 

याप्रसंगी कार्यक्रमास इकोसॅन फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक शिवानी जाधव, अपूर्वा जाधव, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मिक बारवकर, तसेच गोरक्ष पवार, सूर्यकांत देडगे, प्राचार्य लहू वाघुले सर, गोरक्षनाथ केंदळे, मॅचिंद्र रकटे, अरविंद शेंडगे, घनश्याम पाटील, युवराज देशमुख, श्रद्धा ससाणे, दीपा व्यवहारे, आशा भोसले, दिपाली जाधव, उज्वला पगारे, संगीता भुजबळ, कल्पना पैठणे, नलिनी गायकवाड आदी शिक्षकवृंद, कैलास वाडकर, विवेक कांबळे, लोखंडे नानी आदी शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य लहू वाघुले सर यांनी केले.सूत्रसंचालन दीपा व्यवहारे मॅडम यांनी व आभार प्रदर्शन माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी केले.