पुणेमहाराष्ट्रहडपसर

राजस्थानातील फलोदी येथे मराठा टायगर फोर्स च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

हडपसर,

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशात साजरी झाली पाहिजे, याच मुख्य उद्देशाने यावर्षी मराठा टायगर फोर्स आणि राजस्थान राज्य शिवजयंती समारोह समितीच्या वतीने राजस्थानमध्ये शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे आयोजन मराठा टायगर फोर्स तसेच स्थानिक शिवप्रेमींनी केले होते.

शिवजयंती कार्यक्रम हा रविवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी दुपारी राय का बाग ते मनपा कार्यालयापासून नागोर रोडमार्गे मैदानापर्यंत भव्य रॅली व मिरवणूक आणि सायंकाळी पुरस्कार व सन्मान सोहळा हा कार्यक्रम आसाराम मैदान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयाजवळ, आदर्शनगर, फलोदी शहरात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. शिवजयंती साजरी करण्यासाठी राजस्थानातील 36 विविध जाती आणि धर्मातील लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

यावेळी शिशुपाल जंगू, हजारीराम मांजू, शिवप्रकाश ढाका, रामकिशन खारा, सागर मेला, सत्यनारायण जोशी क्रांतिकारी, महेंद्रकुमार चौधरी, फलोदी पोलीस स्टेशन के
एएसआय दिलीप कुमार पुरोहित, हरदेव पालीवाल, संदीप जैन, कर्नाराम जी, दिनेश सियाक, महिपाल उदाणी, सुनील सियोल, सुभाष उदाणी, भरतसिंह राठोड, भजन ढाढरवाल या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये निवड झालेल्या 50 खेळाडूंचाही विशेष गौरव करण्यात आला.

यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून महंत भगवानदास महाराज, योगतज्ञ परिणीती बिश्नोई, दिलहेरसिंग ठाकूर, पर्यावरण प्रेमी खामुराम, विक्रम आदित्यसिंग आमला, पप्पासा बिश्नोई, शिवसेना जिल्हाध्यक्ष गजेंद्र जोशी, भाजप नेते खुशालसिंग राजपुरोहित, चैनसुख शर्मा, प्रेमराम मास्तर, पवन सुथार, हनुमान इसरवाल तसेच अनेक लोकप्रतिनिधी व आदी मान्यवर उपस्थित होते. यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हजारो शिवप्रेमीं उपस्थित होते.

यावेळी महंत भगवानदास, परिणीती बिश्नोई, हरदेव पालीवाल, सत्यनारायण जोशी, शिशुपाल जांगू, शिवप्रकाश ढाका आणि प्रेमाराम मास्तर यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांवर मार्गदर्शन केले.

प्रस्ताविक संदीप लहाने पाटील यांनी केले तर आभार शरद लोंढे पाटील यांनी मानले.

शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन संदीप लहाने पाटील, शरद लोंढे पाटील, श्रीराम जांगू, सुरेश जाणी खारा, मुकेश सियाक, मांगीलाल जांगू, हॅप्पी खिचड, सुजानराम बघानी, विशाल लहाने पाटील, अशोक सारण खारा, पूनाराम डारा, घेवर खारा, मोहन जंगू, दिलीप पालेडीया, ऍड. भजन भाई, मनोज सियोल, सत्यनारायण भोपानी आणि अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले होते.

अधिक माहितीसाठी मराठा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष संदीप लहाने पाटील यांच्याशी ९८२३२१३१७७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.