पुणेमहाराष्ट्र

शिवजयंती निमित्त अभिनव कला महाविद्यालयाच्या वतीने शिवचित्र प्रदर्शन

पुणे (प्रतिनिधी )
अभिनव प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य शिवचित्र प्रदर्शन व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पुजन कार्यक्रम पुणे येथील अभिनव कला महाविद्यालय चौक टिळक रोड येथे संपन्न झाला.
भारतीय कला प्रसारणीय सभेचे सचिव पुष्कराज पाठक व अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल बळवंत हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पुजन करण्यात आले.

या प्रसंगी बाळासाहेब भिसे, सिने कला दिग्दर्शक संदिप इनामके ,पत्रकार अनिल मोरे, हार्दिक परदेशी, कुणाल मोहोळ व अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी निगडित असे विविध चित्र रेखाटण्यात आली होती. सदर चित्र पाहताना महाराजांच्या जीवनातील अनेक विषयाची माहिती मिळाली.चिंतामणी ढोल पथकाच्या वाद्यांचा दणदणीत आवाजात सदर कार्यक्रमाचे आयोजन अभिनव प्रतिष्ठान चे संस्थापक अभिषेक आसोरे, अध्यक्ष सुशिलकुमार भिसे, उपाध्यक्ष रोहित जाधव, लखन भिसे, कार्तिक फासगे, वैभव कोंढेकर, शुभम भुजबळ, सचिन इंगवले आदित्य भोसले गौरव काकडे कल्याणी गोळे, मानसी राऊत व इतर अनेक कार्यकर्त्यांनी केले. सदर कार्यक्रमाचे अभिनव प्रतिष्ठानचे पहिलेच वर्ष होते. छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या निमित्ताने एक वेगळा उपक्रम सादर केल्या मुळे सर्वांनी त्यांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन केले.