पुणेमहाराष्ट्र

स्वराज्य येथे यात्रेच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचा स्वागत कक्ष शिवकार्यातून छत्रपतींना अनोखे अभिवादन

पुणे (प्रतिनिधी )
ऐतिहासिक पुणे शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण गेले, इथेच मॉंसाहेब जिजाऊंनी त्यांच्या मनात स्वराज्याचे बीज पेरले, इथेच अठरापगड जातीच्या, बारा बलुतेदारांच्या सवंगड्यांना सोबत घेत शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. या शिवकार्यात योगदान देत अनेक शूर सरदार घराण्यांनी छत्रपती घराण्यांची सेवा केली. दर वर्षीप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून या सरदार घराण्यांच्या वतीने “स्वराज्य रथ” यात्रेचे आयोजन करण्यात आले.

पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने या स्वराज्य रथ यात्रेच्या स्वागतासाठी स्वागत कक्ष तयार करण्यात आला. याठिकाणी सर्व घराण्यांच्या रथांचे स्वागत करून सन्मान चिन्ह देऊन सर्वांचा यथोचित आदर सत्कार करण्यात आला.

 

या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन करण्यात आले. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करत रोहन पायगुडे, निलेश वरे, अजिंक्य पालकर, फहीम शेख, मंगेश मोरे व सुशांत साबळे यांनी मोलाची कामगिरी बजावली.