भोसरी – स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘जगदंब प्रतिष्ठान’ने शिवजयंतीचे औचित्य साधून दि. २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे आयोजन केले आहे.
भोसरीतील गावजत्रा मैदानावर होणाऱ्या ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे ४ दिवस चालणारे प्रयोग विनामूल्य असून सर्वांना हे महानाट्य पाहता यावे यासाठी प्रभागनिहाय मोफत प्रवेशपत्रिका वितरीत करण्यात येत आहेत. त्यानुसार २२ तारखेला प्रभाग क्रमांक ७- सॅण्डविक कॉलनी, रामनगर, तुकाराम नगर, प्रभाग क्रमांक ८ – भोसरी गावठाण, गवळीनगर, खंडोबा माळ, शीतलबाग. प्रभाग क्रमांक ९ – धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत. प्रभाग क्रमांक १० – इंद्रायणी नगर, लांडेवाडी, शांतीनगर, गव्हाणेवस्ती, महाराष्ट्र कॉलनी. प्रभाग ११ – गवळीमाथा, बालाजीनगर, इंद्रायणी नगर या भागातील नागरिकांना महानाट्य पाहता येणार आहे.
दि. २३ रोजी प्रभाग क्रमांक ३ मधील बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी, रिव्हर रेसिडेन्सी, वुड्स व्हिले, स्वराज रेसिडेन्सी तर प्रभाग क्रमांक ४- मोशी गावठाण, डुडुळगाव, गंधर्व नगरी, क्रिस्टल सिटी, नागेश्वर नगर, सद्गुरू नगर. प्रभाग क्रमांक ५ – चऱ्होली, चोविसावाडी, वडमुखवाडी, काळजेवस्ती, पठारेमळा, बोर्डेवस्ती, ताजणेमळा. प्रभाग क्रमांक ६ – दिघी, गणेशनगर, बोपखेल, समर्थ नगर, बोपखेल गावठाण या परिसरातील नागरिकांसाठी महानाट्याचे प्रयोग होणार आहेत.
प्रभाग क्रमांक २ – चिखली, चिखली गावठाण, मोरेवस्ती, कुदळवाडी, सोनावणेवस्ती, गणेशनगर. प्रभाग क्रमांक १२ – घरकूल, नेवाळेवस्ती, हरगुडेवस्ती. प्रभाग क्रमांक १३ – मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती. प्रभाग क्रमांक १६ – नेहरुनगर, विठ्ठलनगर आणि यशवंतनगर परिसरातील नागरिकांना दि. २४ फेब्रुवारी रोजी हे महानाट्य पाहता येईल.
२५ फेब्रुवारी रोजी ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा भोसरीतील शेवटचा प्रयोग असून या दिवशी प्रभाग क्रमांक १- तळवडे, तळवडे आयटी पार्क, ज्योतिबा मंदिर, एमआयडीसी, रुपीनगर, त्रिवेणीनगर. प्रभाग क्रमांक १४ – यमुनानगर, कृष्णानगर, त्रिवेणीनगर. प्रभाग क्रमांक १५ – पूर्णानगर, फुलेनगर आणि संभाजीनगर परिसरातील नागरिकांना हे महानाट्य पाहता येणार आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे गेल्या अनेक वर्षांपासून मालिका, चित्रपट, व्याख्यानाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचा देशातच नव्हे तर जगभरात प्रसार करीत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे या भूमिकेतून खासदार डॉ. कोल्हे ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग राज्यभरात करत आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना शंभुराजांचा जाज्वल्य इतिहास पाहता यावा यासाठी २२ ते २५ फेब्रुवारी या चार दिवसांत प्रभागनिहाय ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे प्रयोग आयोजित केले आहे. या प्रयोगाच्या काळात भोसरी विधानसभा मतदारसंघात नागरिकांसाठी दुपारच्या सत्रात उपलब्ध राहणार आहेत. या महानाट्याच्या माध्यमातून शंभुराजांच्या जाज्वल्य इतिहासाचा थरारक अनुभव या महानाट्यातून अवश्य घ्यावा असे आवाहन, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.