हडपसर,वार्ताहर. शिवाजीमहाराज केवळ वंशपरंपरागत राजे नव्हते तर ते स्वराज्यसंस्थापक होते. मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन शिवाजीमहाराजांनी रयतेचं राज्य उभारलं.रयतेची काळजी घेतली.शिवरायांचा आदर्श घेऊन आपण समाजासाठी काम करावे असे प्रतिपादन साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त
आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून समाजप्रबोधन करण्यात आले.या मिरवणुकीसाठी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक रमेश महाडिक यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमात कारभारी देवकर व भानुदास पाटोळे या शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य गीत सादर केले. अजय जाधव ,समर्थ शेळके,आदित्य काटकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गणेश निचळे यांनी शिक्षक मनोगतात शिवाजीमहाराज यांच्या समग्र जीवनकार्याचा आढावा घेतला.कविता सुर्यवंशी यांनी शिवरायांच्या जन्माचा पाळणा सादर केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकसभा घेण्यात आली.व त्यात 5 वी व 8 वी च्या पालकांना बदलत्या मूल्यमापन पद्धतीची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,माधुरी राऊत,आजीव सेवक अनिल मेमाणे,पालक संघाच्या उपाध्यक्ष सोनाली गायकवाड,हेमलता वाघमोडे,सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता पाषाणकर यानी केले.सूत्रसंचालन अनिल वाव्हळ व रूपाली सोनावळे यांनी केले.तर आभार सचिन कुंभार यांनी मानले.