जेष्ठ नागरिक हा समाजाचा ठेवा असून आपल्या जवळ असलेले ज्ञान सर्वांना वाटायला हवं व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा जेणेकरुन आलेले नैराश्य दूर होऊन ते आनंदी जीवनाची वाटचाल करू शकतील तसेच या अनुभवाचा उपयोग नवीन पिढीनं करून घेतला पाहिजे असे मत माजी प्राचार्य महादेव वाल्हेर यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने एकदिवसीय जेष्ठ नागरिक शिबिर आयोजन उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन माजी प्राचार्य महादेव वाल्हेर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य बी. जे. जाधव उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक केंद्र कार्यवाह प्रा. डॉ. नाना झगडे यांनी केले.
या शिबिरात प्रभाकर तावरे यांनी ‘जेष्ठांचे आरोग्य’, के. डी. पवार यांनी ‘शंभर वर्षे निरोगी जगा’, पितांबर पाटील यांनी ‘कथाकथनातून जेष्ठांशी संवाद’ मार्गदर्शन केले तर भालचंद्र कोळपकर ‘हास्य मैफिल’ सादर केली.
बदलत्या जीवनमानानुसार ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिती बदलत आहे. घराघरांत आंनदी वातावरण ठेवण्यासाठी सुसंवाद व्हायला पाहिजे. असे मत माजी प्राचार्य बी. जे. जाधव यांनी व्यक्त केले.
ज्ञानाची विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी समाजातील जेष्ठांची महत्वाची भूमिका असून नवीन शैक्षणिक धोरणात ‘कॅंपस टू कम्युनिटी’ या संकल्पनेला महत्व येत असून समाजाचे ज्ञान विद्यार्थ्यांकडे परावर्तित करण्यावर भर असेल. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, डॉ. नितीन लगड, प्रा. शैलजा धोत्रे, डॉ. शुभांगी औटी प्रा. ऋषिकेश मोरे, अनिता गाडेकर, माजी नगरसेवक शिवाजी पवार, डॉ. शोभा पाटील, डॉ. सुनंदा थोरात, पांडुरंग शेवाळे, शिवशंभो जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयप्रकाश शहा, सचिव चंद्रकांत उंबरदंड, किर्लोस्कर जेष्ठ नागरिक संघाचे श्रीशैल जकूणे, सुधीर मेथेकर, शिवाजी माळी, महादेव धर्मे आदी जेष्ठ नागरिकांनी या शिबिरास उदंड प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षदा पाचुंदकर या विद्यार्थिनीने केले तर आभार मनाली रासकर हिने मानले.