आपण नशिबवान आहोत आपली मातृभाषा मराठी आहे पण अजूनही आपण आपली मातृभाषा न जपल्यास आपण कमनशिबी ठरू ! कविता प्रेमाची भाषा बोलते. कवितेतून येणारी प्रेम ही भावना शुद्ध असते. प्रेमाला कोणताही जात धर्म नसतो. त्यापुढे जाऊन पोटाची भूक माणसाला जीवन संघर्ष शिकवते. असे प्रतिपादन प्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे बहि:शाल शिक्षण मंडळ व महात्मा फुले इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कम्प्युटर स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक दिवसीय शिबीरांतर्गत कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनात कवयित्री रुपाली अवचरे, कवी भालचंद्र कोळपकर, कवी म. भा. चव्हाण व कवी प्रदीप निफाडकर यांनी बहारदार कविता सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.
या शिबिराचे उदघाटन महात्मा फुले इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कम्प्युटर स्टडीजचे संचालकसचिन भारद्वाज यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रवीण ससाणे यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी मातृभाषेतूनच आपल्याला ज्ञानाचे आकलन सहज व सोप्या पद्धतीने करता येते. आज नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्व प्राप्त झाले असून भारतीय भाषेतील अभिजात साहित्य संस्कृतीचा अभ्यासाला महत्व दिले जाणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, डॉ. नितीन लगड, प्रा. शैलजा धोत्रे, डॉ. शुभांगी शिंदे, डॉ. अशोक ससाणे, डॉ. राजेश रसाळ, डॉ. वंदना सोनवले, प्रा.ऋषिकेश मोरे, प्रा.अनिता गाडेकर, डॉ. अश्विनी घोगरे, शैलेंद्र बेल्हेकर, सतीश पराळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन केंद्र कार्यवाह प्रा. डॉ. नाना झगडे यांनी केले. सूत्रसंचालन मनाली रासकर या विद्यार्थिनीने केले तर आभार मनीषा तडमल हिने मानले.