पुणेमहाराष्ट्रहडपसर

रात्रीच्या वेळी घरफोडी करणारे विधिसंघर्षित बालक ताब्यात हडपसर पोलिसांची कामगिरी ः एक लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि. २८ ः रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या पाच विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेऊन एक घरफोडी व दोन दुचाकी चोरी जप्त केल्या. आरोपीकडून एक लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, मांजरी बु।।मध्ये सोमवारी (दि. २६ फेब्रुवारी) रात्री अडीचच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटून चोरी केलेल्या आरोपींची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

 

पोलीस उपायुक्त आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पंडित रेजितवाड यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे, अतुल पंधरकर, सचिन गोरखे, अमोल दणके, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, अमित राखरे, कुंडलिक केसकर, अनिरुद्ध सोनवणे, रामदास जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.