पुणेमहाराष्ट्र

“शिवसेनेच्या ओबीसी बारा बलुतेदार विभागाच्या अध्यक्षपदी सोमनाथ काशीद यांची निवड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीने दिले नियुक्तीचे पत्र

( पुणे प्रतिनिधी ) : मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सोमनाथ काशीद यांची ओबीसी बारा बलुतेदार विभाग अध्यक्ष (कार्यक्षेत्र महाराष्ट्र )नियुक्ती झाली.
शिवसेना सचिव संजय मोरे यांनी नियुक्तीचे पत्र दिले.
मुख्यमंत्र्यांनी ओबीसी बारा बलुतेदार यांच्यासाठी घेतलेले निर्णय व शिवसेनेचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी मध्ये पोहचवण्याचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर करणार. असल्याचे सोमनाथ काशीद यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री यांच्या सोबत ओबीसी बारा बलुतेदारांच्या विविध मागण्यांबाबत बैठका घडवणारे मराठा समाजाचे अभ्यासू नेतृत्व योगेशजी केदार, शिवसेना उद्योग विभागाचे प्रमुख उदयजी सावंत, शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेनेचे ठाण्यातील नगरसेवक गणेश वाघ, मुख्यमंत्र्यांचे विश्वासू बाजीराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून व मार्गदर्शनाखाली नियुक्ती जाहीर करण्यात आली.

 

ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देणार…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी बारा बलुतेदार महाराष्ट्र विभाग अध्यक्ष जबाबदारी देऊन माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे, मुख्यमंत्र्यांनी आजवर ओबीसी हिताची भूमिका घेतली आहे, शिवसेना वाढविण्यासाठी व जास्तीत जास्त ओबीसी समाज शिवसेनेसोबत जोडण्यासाठी कार्यरत राहणार आहे.
सोमनाथ काशीद
विभाग अध्यक्ष – ओबीसी बारा बलुतेदार – शिवसेना