पुणेमहाराष्ट्र

यशवंत सहकारी साखर कारखान्याचे दोन्ही पॅनलचे ४२ व इतर १२ उमेदवार रिंगणात

प्रतिनिधि- स्वप्नील कदम

लोणी काळभोर (थेऊर ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनेलचे ४२ उमेदवार वगळता अजून १२ उमेदवार रिंगणात असून त्यांनी आपल्याच पॅनेलला पाठिंबा द्यावा यासाठी दोन्ही पॅनेलच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 

       यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ९ मार्च रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी ३२० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. काल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय आधिका-यांनी १ तास वेळ वाढवून दिली होती. या वेळेत २६६ उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आले. तरीही दोन्ही पॅनेलचे उमेदवार वगळता अजून १२ जणांचे उमेदवारी अर्ज रिंगणात शिल्लक आहेत. 

 

    गट क्र १ मध्ये ३ जागांसाठी ७ उमेदवारी अर्ज, गट क्र २ मध्ये ३ जागांसाठी ८ उमेदवारी अर्ज, गट क्र ३ मध्ये ३ जागांसाठी ७ उमेदवारी अर्ज, गट क्र ४ मध्ये २ जागांसाठी ४ उमेदवारी अर्ज, गट क्र ५ मध्ये २ जागांसाठी ७ उमेदवारी अर्ज व गट क्र ६ मध्ये २ जागांसाठी ५ उमेदवारी अर्ज रिंगणात राहिले आहेत. उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक व पणन संस्था (ब वर्ग) गटात १ जागेसाठी २ उमेदवारी अर्ज, महिला राखीव गटात २ जागांसाठी ४ उमेदवारी अर्ज, अनुसूचित जाती जमाती गटात १ जागेसाठी ३ उमेदवारी अर्ज, इतर मागासवर्गीय गटात १ जागेसाठी ५ उमेदवारी अर्ज, विमुक्त जाती जमाती गटात १ जागेसाठी २ उमेदवारी अर्ज रिंगणात राहिले आहेत. 

                      दोन्ही पॅनेलचे ४२ उमेदवार वगळता    गट क्रमांक १ मध्ये सदानंद यशवंत बालगुडे, गट क्रमांक २ मध्ये धनंजय नानासाहेब चौधरी, राजेश लक्ष्मण चौधरी, गट क्रमांक ३ मध्ये हिरामण नारायण काकडे, गट क्रमांक ५ मध्ये अमोल भिकोबा गायकवाड, भाऊसाहेब ज्ञानोबा गायकवाड, राजाराम पंढरीनाथ गायकवाड, गट क्रमांक ६ मध्ये अनिल रामचंद्र चोंधे यांचे उमेदवारी अर्ज रिंगणात राहिले आहेत. अनुसूचित जाती जमाती गटात अंकुश अमृता कांबळे, इतर मागासवर्गीय गटात भाऊसाहेब ज्ञानोबा गायकवाड, मानसिंग बाळासाहेब गावडे, संतोष पोपट हरगुडे यांचे उमेदवारी अर्ज रिंगणात राहिले आहेत. 

 

  गट क्र ४, उत्पादक व बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था, महिला व विमुक्त जाती जमाती या चार गटात दोन्ही पॅनेलचे वगळता इतर उमेदवार नसल्याने या चार गटात सरळ लढती होणार आहेत.  उमेदवारी अर्ज माघारी न घेतलेल्या उमेदवारांनी आपल्या पॅनेलला पाठिंबा द्यावा यासाठी दोन्ही पॅनेलचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 

                      आगामी काळात नारळ फोडून प्रचाराला सुरवात होणार आहे. प्रचारामध्ये दोन्ही पॅनेल एकमेकांवर जोरदार टीका करणार आहेत. कारखाना बंद का पडला ते निवडून आल्यावर आम्ही कारखाना कसा चालू करणार या संदर्भात दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर वेगवेगळी आयुधे सोडली जाणार आहेत. समोरच्या बाजूकडून आलेल्या टिकेला कशा पद्धतीने उत्तर दिले जाते. ते उत्तर शेतकरी सभासदांना किती पटणार ? मान्य होणार ? यावरच विजयाचा लंबक नीकुणीकडे जाणार हे ठरणार आहे. एकंदरीत आगामी काही दिवस होणा-या प्रचारात शेतकरी सभासद कारखान्याची चावी कुणाकडे देणार हे ठरणार आहे.