पुणे (प्रतिनिधी )
महंमदवाडी परिसरातील सैनिग्रीया सोसायटी, रहेजा विस्टा सोसायटी परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली होती, 24×7 या महापालिकेच्या योजनेत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून काम तातडीने व्हावे याकरिता शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी लष्कर पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या.
जलवाहिनीचे काम होऊन साधारण एक महिन्यात येथील पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे नाना भानगिरे यांनी सांगितले.
लाखो, करोडो रुपये भरून सदनिका घेतल्या, जवळील चार ते पाच सोसायट्यामध्ये हजारो नागरिक राहतात, परंतु पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील सोसायटी परिसरातील नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली आहे, रहिवाशांनी त्यांची कैफियत माजी नगरसेवक व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्याकडे मांडली, सेनिग्रीया सोसायटीपासून आठ इंची जलवाहिनी रहेजा सोसायटीपर्यंत टाकण्याचे काम सुरू आहे, पाण्याच्या टाक्या बांधून पडून होत्या महापालिकेकडे पाठपुरावा करून या टाक्यांमधून पाणीपुरवठा करण्याबाबत मागणी केली जलवाहिनीचे काम 15 ते 20 दिवसात पूर्ण होणार असून या संदर्भात काम लवकर व्हावे म्हणून लष्कर पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
यावेळी लष्कर पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, अधीक्षक अभियंता रणदिवे, अधीक्षक अभियंता वायदंडे, कार्यकारी अभियंता सुभाष पावरा, उपअभियंता बोरसे, खुडे व कनिष्ठ अभियंता वासकर आदी यावेळी उपस्थित होते.
जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण होऊन साधारण एक महिन्यात येथील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा अशी आग्रही भूमिका मांडली आहे त्यामुळे येथील सोसायटी परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी माहिती माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली आहे.
हडपसर मध्ये एकमेव माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगरे यांच्या कार्यालयात जनता दरबार भरतो तेथे नागरिक आपल्या अडचणी मांडतात पुणे महापालिका व प्रशासनाकडून ते प्रश्न सोडवून घेण्यासाठी भानगिरे कायम प्रयत्नशील असतात. यासंदर्भात लष्कर पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता सुभाष पावरा यांच्याशी संपर्क साधला असता, येथील पाणीपुरवठा बाबत जलवाहिनी काम सुरु आहे, एक महिन्यात पाणी देण्याची व्यवस्था करण्यात येईल असे सांगितले.