पुणे

“यशवंत साखर कारखान्याची निवडणूक आरोप-प्रत्यारोपाने गाजतेय… “सहा एकरवरून प्रकाश जगताप यांची शंभर एकर मजल – प्रकाश म्हस्के… “कारखान्याची जमीन लाटण्यासाठी प्रकाश म्हस्के, माधव काळभोर यांचा आटापिटा – प्रशांत काळभोर…

पुणे / थेऊर (अनिल मोरे)

यशवंत सहकारी कारखाना निवडणूक दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी व पॅनल प्रमुखांनी एकमेकांवर टोकाचे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले असताना मतदारांनी नेमका कोणावर विश्वास ठेवायचा? निवडून आलेल्या पॅनलला कारखाना चालू करण्यास असलेल्या प्रचंड अडचणींवर मात करता येणार का? राज्य शासनाची मदत मिळून हा कारखाना चालू होणार का? की फक्त कारखान्याच्या जमिनीवर डोळा ठेवून संचालक मंडळात जाण्यासाठी धडपड सुरू आहे असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे.

जुन्या संचालक मंडळामध्ये यशवंत सहकारी साखर कारखाना बंद पडला यात शेतकऱ्यांची देनी राहिली व कारखाना पुन्हा उभा करण्यासाठी 100 ते 200 कोटी रुपयांची आवश्यकता असताना सहकार खात्याने कारखान्याची निवडणूक लावली बंद पडलेल्या कारखान्यामध्ये संचालक होण्यासाठी तब्बल 320 उमेदवारांनी अर्ज भरले होते हवेली तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले परंतु तीच मंडळी पुन्हा कारखान्याच्या संचालक मंडळावर जात असल्याने व नव्या युवकांना स्थान मिळत नसल्याने निवडणूकच घ्यायचा चंग काहींनी बांधल्याने पर्यायाने निवडणुकीला सामोरे जावे लागले, यामध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप ही झाले,
थेऊर (ता. हवेली ) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी कारखान्यांचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर संचालक रोहिदास उंद्रे यांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप अण्णा गायकवाड, प्रकाश जगताप, विद्यमान संचालक प्रशांत काळभोर व कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे, यामध्ये अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलला ‘किटली’ तर अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलला ‘कपबशी’ चिन्ह देण्यात आले आहे.

यशवंत सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी विरोधक खोटे आरोप करून जनतेचे फसवणूक करीत आहेत परंतु जनता सुज्ञ आहे त्यांच्या बिनबुडाच्या आरोपाला बळी पडणार नाही अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल हे शेतकरी व संचालकांच्या हितासाठी उभे करण्यात आले असून कारखान्यावर एक हाती वर्चस्व असणार आहे तसेच कारखान्याचा एक इंच तुकडा न विकता कारखाना चालू करणार असल्याचा विश्वास माजी उपाध्यक्ष माधव अण्णा काळभोर यांनी व्यक्त केला.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना विरोधी पॅनलचे प्रमुख प्रकाश जगताप यांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला त्यामधून सहा एकरचे शंभर एकर अशी तुमची प्रगती झाली तुमच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आमच्याकडे आहेत जाहीर सभेत समोरासमोर चर्चा करा गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नीट चालवा मग कारखाना चालवण्याचे स्वप्न बघा असा थेट हल्ला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के यांनी प्रकाश जगताप यांच्यावर केला.
जिल्ह्यात सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या हवेली तालुका खरेदी-विक्री संघावर कर्ज झाले म्हणून प्रकाश म्हस्के व माधव काळभोर या दोघांनी खरेदी विक्री संघाच्या बारा गुंठे जागेची बिल्डरला विक्री केली हवेली तालुका खरेदी-विक्री संघाप्रमाणेच यशवंत कारखान्यावरी कर्जाचा मोठा डोंगर आहे सत्ता मिळाली तर वरील गुरु-शिष्यची जोडी कारखान्याची जमीन बिल्डरच्या घशात कशावरून घालणार नाही? कारखान्यात तुम्ही काय दिवे लावणार असा सवाल हवेली बाजार समितीचे संचालक व अण्णासाहेब शेतकरी विकास आघाडीचे प्रचारक प्रशांत काळभोर यांनी विरोधी पॅनल प्रमुख प्रकाश म्हस्के व माधव काळभोर यांना केला.

दोन्ही पॅनलच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आक्षेप व आरोप केले जात असतानाच भ्रष्टाचार आणि उणीदुनी काढली जात आहेत, त्यातच हा कारखाना चालू करण्यासाठी 100 ते 200 कोटी रुपयांचा निधी आवश्यक असताना तो उपलब्ध कसा होणार? निवडून आलेले संचालक मंडळ नेमके काय करणार? का सर्व आटापिटा यशवंत सरकारी कारखान्याच्या जमिनीवर डोळा ठेवून चालला आहे का? असा प्रश्न मतदारांना पडला आहे.
यातून कोणते पॅनल निवडून येते व कारखाना सुरू होतो का नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.