पुणे

“पीएमपीएमएलच्या कामगारांसाठी सत्ताधारी शिवसेनेचे शहर प्रमुख आक्रमक… “पीएमपीएमएल प्रशासनाला नाना भानगिरे यांनी धरले धारेवर..

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सेवेत(Pune) कार्यरत असणाऱ्या बदली कामगारांना सेवेत कायम करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणारे शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी आज अत्यंत आक्रमक भूमिका घेत पीएमपीएमएल प्रशासनाला धारेवर धरले. 

व्यवस्थापकीय  अध्यक्षांच्या दालना बाहेरच ठिय्या मांडून जोपर्यंत बदली कामगारांना सेवेत समाविष्ट करून कायम करण्यासंदर्भात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता प्रशासन करीत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा भानगिरे यांनी घेतला.

त्यानंतर तातडीने पीएमपीएमएल प्रशासनाने 1895 बदली कामगारांना कायम करण्यासंदर्भातील निर्णयाबाबत येत्या सोमवारी संचालक मंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशीही याबाबत सकारात्मक चर्चा करून बदली कामगारांना सेवेत कायम करण्यात येणार असल्याचे आश्वासन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना पीएमपीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष संजय कोलते यांनी दिले.

त्याननंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर,पीएमपीएमएल कर्मचारी संघटनेचे नरेंद्र आवारे, पांढरे व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.